हट्टी मुलीचा खून करणाऱ्या वडिलांना जन्मठेप

पुणे – चाकू घेऊन आईवर धावून गेलेल्या हट्टी मुलीचा खून करणाऱ्या वडिलांना जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरीक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
महेश पुरुषोत्तम मखी (50, रा. शुक्रवार पेठ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने मुलगी मेधा (22) हिचा खून केला होता. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी काम पाहिले. विश्रामबागचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिंदे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना पोलीस हवालदार अमित केकाण आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पालांडे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. ही घटना 13 मे 2011 रोजी सकाळी 10.30 वाजता शुक्रवार पेठेतील मखी कुटुबियांच्या राहत्या घरात घडली. मेधा ही हट्टी होती. घरच्यांचे ऐकत नव्हती. रात्री उशिरापर्यंत घरातून बाहेर थांबत असे. तोकडे कपडे घालत असे. या अथवा कोणत्या ना कोणत्या कारणावरून घरातील लोकांशी ती वाद घालत असे. घरातील लोकांना मारहाण करत असे. गॅसची नळी काढून मारण्याची धमकी देत असत. घटनेच्या दिवशी तर ती जन्मदात्या आईवरच चाकू घेऊन धावली होती. या कारणामुळे वैतागलेल्या महेश याने सुऱ्याने गळ्यावर वार करून मेधा हिचा खून केला. ते स्वत:हून विश्रामबाग पोलीस स्टेशनला हजर झाले. त्यांनीच याबाबत पोलिसांत फिर्याद दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करत न्यायलयाने ही शिक्षा सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)