हज यात्रेसाठी 20 लाख भाविक मक्केत दाखल

जेद्दा – सौदी अरेबियातील मक्का येथे हज यात्रेसाठी यंदा जगभरातून 20 लाख भाविक जमा झाले आहे. या वर्षीच्या हज यात्रेत इराणचे नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. गतवर्षी इराणमधून एकही भाविक या यात्रेसाठी आलेला नव्हता. मुस्लीम समाजात आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी, अशी श्रद्धा आहे.

या यात्रेत 2015 साली प्रचंड चेंगराचेंगरी होऊन माजलेल्या अफरातफरीत 2300 जण ठार झाले होते व त्यात इराणच्या 464 नागरिकांचा समावेश होता. त्यावरून इराणने सौदी सरकारवर आरोप करताना जाणूनबुजून हा अपघात होऊ दिल्याचा दावा केला होता. त्यामुळे दोन्ही देशातील राजकीय संबंधही बिघडले होते. यंदा मात्र पुन्हा एकदा इराणचे भाविक हज यात्रेसाठी आले आहेत.

दरम्यान, मार्च महिन्यात झालेल्या करारानुसार सौदी अरबने ईराणी हज यात्रेकरूंना व्हिजा देण्यास सहमती दिली. त्यानंतर सुमारे 86 हजार ईराणी हज यात्रेसाठी सौदी येथे आले आहेत. सौदी सरकारने इराणच्या ईराण एयरलाही उड्डाण करण्यास परवानगी दिली आहे.

या यात्रेत मुस्लीम बहुल असलेल्या इंडोनेशियाचे सर्वाधिक यात्रेकरू आहेत. जेद्दा येथे पोहचलेल्या इंडोनेशियन नागरिक इनी म्हणाली की, या पवित्र ठिकाणी येण्याचे अनेक लोकांचे स्वप्न असते आणि या धार्मिक स्थळाला मी भेट दिल्याने खूप उत्साही आहे. या ठिकाणी आल्यानंतर धर्माच्या खूप जवळ आल्यासारखे वाटते, असे तिने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)