हज यात्रेच्या रकमेवर चोरटयाचा डल्ला

पुणे,दि.24- कोंढवा परिसरातील सदनिका फोडून चोरटयांनी तीन लाख रुपयांची रोकड चोरली. आई-वडिलांना हज यात्रेला पाठवण्यासाठी तक्रारदाराने ही रक्कम साठवली होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी गऊसलाजम सज्जन(27,रा.नुर पार्क, कोंढवा-खुर्द) हे सदनिकेला कुलूप लावून अर्ध्या दिवसासाठी बाहेर गेले होते. दरम्यान परतल्यावर त्यांना घराचे कुलूप उचकटलेले दिसले. त्यांनी घरात पहाणी केली असता बेडरुमच्या कपाटातील तीन लाखाची रोकड चोरीला गेल्याचे आढळले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

फिर्यादी यांचा उत्पादन विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे आई-वडिल मुळ गावी गेले होते. यामुळे ते घरी एकटेच होते. व्यवसाया निमीत्त ते सकाळी सहाच्या सुमारास घराबाहेर पडले. घरी आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. आई-वडिलांना हज यात्रेला पाठवण्यासाठी त्यांनी तीन लाखाची रोकड जमा केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)