हजार दिवसांच्या भटकंतीवर निघालेला अवलिया…!

असाइनमेंट, प्रॅक्‍टिकल, जर्नल, सबमिशन, व्हायवा अशी कधी न संपणारी शैक्षणिक कामे कॉलेज लाईफ मध्ये प्रत्येकच विद्यार्थ्याच्या पाचवीला पुजलेली असतात. अशा ‘बिझी’ स्केड्युलमुळे कोंडलेला श्वास थोडासा मोकळा करण्यासाठी आपल्या चार आवडीच्या मित्रांना घेऊन एखाद्या ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ टाईप ‘ट्रिपवर’ जाण्याचे स्वप्न प्रत्येक कॉलेज स्टुडंटचे असते. असच तुमच्या माझ्यासारखं भ्रमंतीचा स्वप्न होतं “नूसीर यासिन” या मूळचा इस्त्रायली असणाऱ्या वर्षीय तरुणाचं.

आपल्या जगभ्रमंतीच्या स्वप्नासाठी नूसीरने मध्ये ‘टिपिकल लाईफ’ जगणाऱ्यांना काहीसा धोकादायक वाटेल असा निर्णय घेतला. हा निर्णय होता हातात असणारा, डॉलर पर इअरचं पॅकेजचा आपला जॉब सोडून-दिवसांसाठी नाही तर तब्बल दिवसांसाठी सर्व काही मागे सोडून जग भ्रमंतीवर जाण्याचा! त्याचा हा निर्णय ऐकून त्यावेळी इतरांनी त्याला वेड्यात काढलं नसेल तर नवलच! परंतु म्हणतात ना “एव्हरी ग्रेट ड्रीम स्टार्टस विथ ए ड्रीमर”. असाच हा ‘ड्रीमर’ नूसीर आपल्या पक्‍क्‍या निर्धाराच्या जोरावर ‘वन थाऊसंद डेजच्या जर्नीवर’ निघाला आणि बघता बघता त्याने आपल्या भटकंतीचे आज अखेर दिवस पूर्ण केले आहेत.

-Ads-

नूसीरची दिवसांची भटकंती सुरु असतानाच त्याने ‘नास डेली’ नावाने एक फेसबुक पेज काढले. या पेजच्या माध्यमातून त्याने आपल्या भटकंती दरम्यान आलेला रोजचा एक अनुभव ‘एका’ मिनिटात व्हिडीओ द्वारे सांगण्याचा विडा उचलला. ‘नास डेली’च्या माध्यमातून नूसीरने आतापर्यंत व्हिडीओ पोस्ट केले असून प्रत्येक व्हिडीओ द्वारे काहीतरी नवीन माहिती देण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे.

‘नास डेली’ या त्याच्या फेसबुक पेजला देखील जगभरातून प्रतिसाद मिळत असून या पेजला जवळ जवळ लाख लोकं फॉलो करत आहेत. त्याच्या व्हिडीओजना मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे फेसबुकचा संस्थापक मार्क जाकेरबर्ग याने देखील नूसीरची भेट घेऊन त्याच्या व्हिडीओजला ‘शो’चा दर्जा दिला आहे. नूसीर हा सध्या युवकांसाठी ‘ट्रॅव्हल आयकॉन’ बनला असून आपल्या व्हिडीओजच्या माध्यमातून तो महिन्याला डॉलर्स पर्यंत कमाई करत आहे. हा दिवसांचा प्रवास संपल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने अशीच भटकंती करण्याचा त्याचा मानस आहे. डिजिट सॅलरीचा जॉब, डुप्लेक्‍स अपार्टमेंट, लक्‍झरी कार अशा सर्व आभासी सुख सुविधांना बगल देत मोकळ्या हवेत जगणाऱ्या नूसीरला सलामच…!!

– प्रशांत शिंदे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)