हजार टनाची आवक ठप्प

संग्रहित छायाचित्र
मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सातारा मार्केट कमिटीमध्ये मार्केट यार्ड , पुणे, बारामती, लोणंद, वालचंदनगर येथून होणाऱ्या . भाजीपाल्याची आवक ठप्प झाली . तरी पण भाजीपाल्याच्या दरांवर काहीच परिणाम होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले . कांद्याचा अपवाद वगळता इतर भाज्यांच्या दर स्थिर असण्याचे सांगण्यात आले . बाजार समितीत साधारण साडेबाराशे किलोची भाज्यांची आवक होते . सातारा शहर तसेच तालुक्‍यांच्या ठिकाणी व्यापारी, विक्रेते, व्यावसायिक यांनी बाजारपेठा बंद ठेवल्या. साताऱ्यात दूध संकलनासह पेट्रोल पंप , भाजीमंडई बंद राहिल्याने सर्वसामान्यांची काही प्रमाणात अडचण झाली . दूध संकलन केंद्रे बंद राहिल्याने साधारण दहा लाख लीटर दुधाला फटका बसला . परळी, डबेवाडी, सोनगाव, शेंद्रे, जकातवाडी या भागानून होणाऱ्या दूध पुरवठ्यावर अपवाद वगळता परिणाम झाला . जिल्ह्यात एसटी सेवा बंद राहिल्याने कोकण, कोल्हापूर, मुंबई, पुणे येथील दळणवळण ठप्प झाले .
आयटी आयची परीक्षा मात्र सुरळीत – ऑगस्टच्या बंदच्या पाश्वभूमीवर आयटीआयच्या परीक्षा मात्र सुरळीत पार पडल्याचे वृत्त आहे . परीक्षार्थीसाठी विशेष वाहनाची सोय करण्यात आली होती
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)