हजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार

जोरदार तयारी : शासकीय विश्रामगृहात बैठक

सातारा –
राममंदिर उभारणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दि.25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाणार असून त्यांच्यासमवेत सातारा जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक जाणार आहेत. त्याबाबत पूर्व तयारीची बैठक बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, हर्षल कदम यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

बैठकी दरम्यान, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातून अधिकाधिक शिवसैनिकांनी अयोध्येला जाण्याच्या दृष्टीने आत्तापासून तयारीला लागण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अयोध्येला येणारे शिवसैनिक व नागरिक यांचे ओळखपत्रासहित नावांची यादी जिल्हाप्रमुखांकडे सादर करण्यात यावी, अशा देखील सूचना यावेळी करण्यात आल्या. तसेच शिवसैनिकांनी मते व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत राम मंदिर उभारलेच पाहिजे अशी मागणी यावेळी केली.

-Ads-

यावेळी बोलताना चंद्रकांत जाधव म्हणाले, जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक पक्षाच्या शिस्तीप्रमाणे अयोध्येला जाणार आहेत. अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाऊल उचलले असून त्यांना ताकद देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिक हा अयोध्येला जाणार असून त्यांच्या याद्या दि.18 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत सादर करण्यात येणार असून त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रेल्वे अथवा बसने शिवसैनिक अयोध्येला जाणार आहेत.
यावेळी बाळासाहेब शिंदे, किसनराव नलवडे, निमिष शहा, दत्तात्रय नलवडे, रमेश बोराटे, निलेश मोरे, संतोष बेडके, संजय गायकवाड, किरण भोसले, दिलीप पवार, सचिन बिडवे, रुपेश वंजारी, रामभाऊ रैनाक, सुमित नाईक, रवींद्र शेळके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)