हजारो वैष्णवांची वाट बिकट

निमसाखर- बारामती-बावडा रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली असूनही इंदापूर, भिगवण सार्वजनिक बांधकाम खाते झोपले की काय? असा स्थानिकांसह प्रवाशांनी उपस्थित केला आहे. दोन्ही बांधकाम विभागाअंतर्गत येणारा हा रस्ता अनेक ठिकठिकाणी खचलेला असून काही ठिकाणे उंचवटे, रस्त्याच्याकडेला असलेली काटेरी झुडपे रस्त्यावर आली आहे, तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली असल्याने संत सोपानकाका महाराज व संत संतराज महाराज पालखी सोहळ्याची वाट बिकट असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नीरा-नरसिंगपूर, बावडा, कळंब आणि बारामती हा रस्ता पूर्वी प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून या रस्त्याची ओळख होती. यानंतर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकाळात या मार्गाला बढती मिळत राज्य मार्ग म्हणून मान्यता मिळाली. राज्य मार्गाच्या बढतीनंतर पुरेसा निधी या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी मिळेल, अशी आशा या मार्गालगतच्या नागरिकांना होती. मात्र बिकेबिएन रस्त्याला राज्य मार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर आज तागायत पुरेसा निधी मिळाला नसल्याचे या रस्त्याच्या अवस्थेवरुन स्पष्ट होत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये सासवडहून संत सोपानकाका महाराज व वाळकीहून संत संतराज महाराज पालखी सोहळ्यासह कमीत कमी दहा व त्यापेक्षाही अधिक पालखी सोहळे या रस्त्याद्वारे पंढरपूरला मार्गस्थ होता. मात्र या रस्त्याबाबत प्रवाशांच्या दिवसेंदिवस तक्रारीचा पाढा वाढत चालला आहे. रस्त्यावर बावड्या पासून निरवांगी पर्यंत, निमसाखर शेळगाव ओढा ते निसर्ग ढाब्या पर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याचबरोबर कळंब ते तावशी पर्यंतची वाटच बिकट झाली आहे. यासह अन्य भागातील रस्त्यांची सुद्धा दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या अनेक भागात साईड पट्ट्यावरच काटेरी झुडपांनी अतिक्रमण केले आहे.हा रस्ता ठिकठिकाणी रस्ता खचून कुठे उंचवटे तर कुठे खोलगट रस्ता झाला आहे.जागोजागी खड्डे आणि शेतकऱ्यांनी पाइपलाइनसाठी काढलेल्या चाऱ्या अशी अवस्था रस्त्याची आहे. यात कमी म्हणून केबलसाठी चाललेले काम काही ठिकाणी धिम्या तर अनेक ठिकाणी वेगात सुरु आहे. हे काम पालखी सोहळ्यापूर्वी संपवावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

  • निमसाखर ते कळंब दरम्यान मोठ्या प्रमाणावर रस्ता खराब झाल्याच्या खात्याकडे अनेक तक्रारी आहेत. याप्रमाणे दुरुस्तीचे काम तातडीने घेऊ. रस्त्याच्याकडेची वाढलेली काटेरी झाडेझुडपे यादरम्यान काढली जातील. संबंधित केबल कंपनीचे अधिकारी बारामती-बावडा रस्त्याची पाहणी करणार आहेत.
    – धनंजय धुमाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, भिगवण विभाग
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)