हजारो रिकामे फ्लॅट आणि बेघर नागरिक (भाग-२)

दसरा, दिवाळी सण जवळ आला की, घर अनेकप्रकारच्या “रोषणाई’ ने उजळून निघते आणि त्यामुळे घराला एक देशात वेगाने होणाऱ्या औद्योगीकरणामुळे शहरातील उपनगरात स्थलांतराची संख्या वाढेल, अशी शक्‍यता गृहीत धरून उभारण्यात आलेले हजारो फ्लॅट आजघडीला ग्राहकांअभावी धूळखात पडून आहेत. रिकाम्या घराबाबत अनेकदा माध्यमातून चर्चा होते.

हजारो रिकामे फ्लॅट आणि बेघर नागरिक (भाग-१)

बेघरांची संख्या विपूल असताना घरे रिकामी राहतात कशी हा प्रश्‍न आहे. यामागे तीन कारणे आहेत. गरिबांसाठी परवडणारी घरे ही शहरापासून दूर बांधण्यात आली आहेत. तेथून सहजासहजी कामाच्या ठिकाणी जाणे शक्‍य नाही. त्यामुळे अशा लांब ठिकाणी असलेल्या घरातून वाहतुकीची व्यवस्था नसल्यास कामावर जाण्यास नागरिक बिचकतात. दुसरे म्हणजे घरांचा आकार. लहान कुटुंबाला राहण्याजोगे घराचा आकार नसेल आणि सोयीसुविधा नसणे आणि तिसरे म्हणजे जरी घरे स्वस्त असली तरी ते घर ताब्यात घेण्यासाठी पुरेशी रकमेची जमवाजमव न होणे. हाऊसिंग सेक्‍टरशी निगडित कार्यकर्त्यांच्या मते, वंचित आणि अति गरिबांसाठी तयार केलेल्या निवासी योजना या खासगी सेक्‍टरवर अवलंबून असतात. यानुसार बिल्डर झोपडपट्टीच्या ठिकाणी चांगले घर बांधतील आणि तेथे गरिबांना राहण्यासाठी जागा देतील, असे गृहित धरलेले असते. यानंतरही जी काही जमीन शिल्लक राहील त्याची बाजारदराप्रमाणे विक्री करण्याची मूभा असेल; परंतु असे चित्र सर्वत्र दिसेलच असे नाही.

यूपीए सरकारची राजीव गांधी आवास योजनेतील घरांच्या किमतीचे 50 ते 75 ओझे हे सरकार उचलत होती. उर्वरित रक्कम राज्य सरकार आणि नाममात्र रक्कम ही लाभार्थ्याला द्यावी लागत होती. मात्र, एनडीए सरकारने ही योजना रद्द केली. देशातील रिकाम्या घरांच्या समस्येबाबत चर्चा ही प्रथमच होत आहे, असे नाही.

गेल्यावर्षी संपूर्ण देशभरात केलेल्या सर्व्हेक्षणानुसार शहरी भारतात सुमारे 1.2 कोटी घरे रिकामी पडून आहेत, असे आढळून आले आहे. साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालकाने दिलेल्या माहितीनुसार शहरातील घरांची संख्या कमी असली तरी रिकाम्या घरांची संख्या देखील तितकीच आहे. या लेखात आर्थिक सर्व्हेक्षणाचा मुद्दा देखील उपस्थित केला गेला होता. त्यानुसार शहरात सुमारे 1.88 कोटी घरांची कमतरता आहे. त्यापैकी 95.6 टक्के भाग हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांतील मध्यमवर्गीय उत्पन्न गटांतील लोकांचा आहे. अशी स्थिती असताना खरेदीदार नसतानाही घराची निर्मिती केली जात आहे आणि असा विरोधाभास कशामुळे आहे, हाही प्रश्‍न आहे.

– सत्यजित दुर्वेकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)