हजारो मैलांवर बसून बोलणे सोपे असते – रवी शास्त्री

मेलबर्न: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्य दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर भारतीय संघावर आणि अनुक्रमे विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. मात्र, पराभवानंतर माजी क्रिकेटपटूंकडून झालेल्या टीकेला प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. हजारो मैलांवर बसून उथळ टीका करणे सोपे असते. आमची त्याला हरकत नाही. संघासाठी जे-जे चांगले आहे ते करण्यावरच आमचा भर आहे एवढंच मी म्हणेन,’ असे शास्त्री यावेळी म्हणाले.

पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 146 धावांनी पराभव केला. यावेळी भारतीय संघाच्या कामगिरी पेक्षा जास्त चर्चा झाली चुकीच्या संघ निवडीची आणि भारतीय संघाची मैदानावरिल वर्तवणूकीची. त्यात सुनील गावसकर यांनी थेट संघ व्यवस्थापन व कर्णधार विराट कोहली याला जबाबदारीची जाणीव करून देताना संघ निवड करताना विचार करायला हवा अशी बोचरी टीका केली होती. ही टीका झोंबल्याने शास्त्रींनीही उत्तर दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रवींद्र जडेजा व ईशांत शर्मा यांच्यात मैदानावर झालेला वाद टीव्हीवर सर्वांना दिसला याबद्दल विचारले असता शास्त्रींनी तो प्रश्न उडवून लावला. अशा गोष्टींना महत्त्व मिळत असल्याबद्दल मला काही आश्‍चर्य वाटत नाही. मलाही ते आवडते. कदाचित त्यातून संघ सहकारी आणखी जवळ येण्यास मदत होईल, असही ते म्हणाले. तसेच विराटच्या मैदानावरील वर्तनावर चहूकडून टीका होत असताना शास्त्रींनी मात्र त्याची पाठराखण केली आहे. यावेळी ते म्हणाले की, विराट एक चांगला माणूस आहे. त्याच्या वागण्यात खटकण्यासारख काय आहे? प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, पण माझ्या मते विराट हा “जंटलमन’ आहे. त्यामुळे हा वाद विनाकारण केला जात आहे असे मला वाटते.

संघ निवडीतील गोंधळाबद्दल त्यांना विचारले असता शास्त्री म्हणाले, निवड समिती गोंधळल्याचे जे चित्र तज्ज्ञांकडून निर्माण केले जाते आहे ते चुकीचे आहे. रवींद्र जाडेजाला खेळवायचे की नाही एवढाच आमच्यापुढे प्रश्न होता. त्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही अडचण आमच्या समोर त्या सामन्यापुर्वी नव्हती आणि असलीच तरी त्याचा माझ्याशी काही संबंध नव्हता. त्यामुळे निर्मान केले जात असलेले चीत्र हे चुकिचे असून आमच्या साठीसंघाचा विजय महत्वाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)