हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जाणार महामेळाव्याला

  • घर चलो अभियानाची चिंचवड-किवळे मंडलामधून सुरुवात
  • मंडल अध्यक्ष काळुराम बारणे यांची माहीती

वाकड, (वार्ताहर) – पिंपरी येथील भाजपा कार्यालयात चिंचवड – किवळे मंडलाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. घर चलो अभियान आणि 6 एप्रिल रोजी मुंबईत होत असलेल्या पक्षाच्या महामेळाव्याच्या पूर्वतयारीची सुरुवात या बैठकीच्या माध्यमातून झाली. पूर्वतयारीच्या नियोजनासाठी शहर चिटणीस अमोल थोरात, समन्वयक प्रमोद निसळ व मंडलाध्यक्ष काळुराम बारणे यांनी मार्गदर्शन केले.

भाजप शहराध्यक्ष व चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सूचनेनुसार 29 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत घर चलो अभियान तसेच 6 एप्रिल रोजी पक्षाचा मुंबईत होणारा महामेळावा या दोन्ही महत्वाच्या कार्यक्रमांची पूर्वतयारी तसेच या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाच्या खराळवाडी येथील कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाजपचे प्रवक्‍ते अमोल थोरात यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना 29 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राबवण्यात येणाऱ्या घर चलो अभियानाची सविस्तर माहिती दिली. भाजपने केलेली विविध विकासकामे तसेच जनतेच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय याची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवणे गरजेचे असून यासाठी हे अभियान महत्वाचे असल्याचे सांगत हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन केले.
समन्वयक प्रमोद निसळ यांनी पक्षाच्या मुंबई येथे 6 एप्रिल रोजी होणाऱ्या महामेळाव्याची माहिती दिली. यावेळी राज्यभरातून लाखोच्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार असून आपल्या शहरातून देखील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मेळाव्यास जाण्यास उत्सुक आहेत, यासाठी उत्तम नियोजन करायला हवे, असे ही ते म्हणाले.

चिंचवड – किवळे मंडल अध्यक्ष काळूराम बारणे यांनी बैठकीच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले की, शहर भाजपाने महानगर पालिकेच्या माध्यमातून केलेली विविध विकासकामे, पारदर्शी कारभार, घेतलेले महत्वपूर्ण निर्णय तसेच राज्य व केंद्र सरकारने हाती घेतलेली लोकहिताची कामे, विविध योजनांची माहिती घरोघरी जाऊन लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. यासाठी वार्ड, प्रभागनुसार नियोजन करणे आवश्‍यक आहे, याकरिता चिंचवड – किवळे मंडल विभागातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रयत्न करावा असे आवाहन ही त्यांनी केले.
या बैठकीस नगरसेवक नामदेव ढाके, बाळासाहेब ओव्हाळ , ऍड.मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, कैलास बारणे तसेच नगरसेविका माया बारणे, अर्चना बारणे, करूणा चिंचवडे, संगीता भोंडवे, चिंचवड – किवळे मंडलाचे व शहर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)