काबुल – अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवायांसाठी कुख्यात असलेल्या हक्कानी नेटवर्कचा प्रमुख जलालुद्दीन हक्‍कानी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. त्याला अफगाणि तालिबानी गटांनीही दुजोरा दिल्याचे वृत्त आहे. तो गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याने आपल्या हस्तकांकरवी अनेक उपद्‌व्याप करून घातपाती कारवाया घडवून आणल्या होत्या.

अल्लासाठी झालेल्या लढ्यात त्याने मोठे योगदान दिल्याचा गौरवही तालिबान्यांनी केला आहे. एसआयटीई या संघटनेने त्याच्या निधनाची बातमी दिली आहे. हक्‍कानी नेटवर्कवर अमेरिकेन आणि त्यांच्या मित्र देशांनी अनेक हल्ले केले करून त्यांचे नेटवर्क नेस्तानबुत केले आहे पण तरीही त्या संघटनेचे अस्त्वित टिकवून ठेवण्यात त्याने मोठीच भूमिका बजावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)