हक्काच्या घरासाठी फासेपारधींचे साकडे

नायगाव-पुरंदर तालुक्‍यात फासेपारधी समाजाची संख्या लक्षणीय आहे. या समाजातील कुटुंबांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीेन पुरंदरच्या गटविकास अकिाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
पारधी कुटुंबातील कुटुंबे आजही पुर्वश्रमीचे हलाकीचे व दारिद्य्रमय जीवन जगत आहेत. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर सुद्धा हा समाज आजही मिळेल त्या जागेवर पाल टाकून किंवा उघड्यावर राहताना आपण सर्वजण डोळसपणे पाहात आहोत. शासनाचे पंतप्रधान आवास योजना, फासेपारधी घरकुल योजना व शबरी घरकुल विकास योजना या योजनेतुन फासेपारधी समाजाला घरकुल योजनेचा लाभ देऊन त्यांना हक्काचे घर मिळू शकते; परंतु प्रस्थापित ग्रामपंचायत व ग्रामसेवक हे या समाजाचे घरकुल प्रस्ताव पाठविण्यास अनुकूल नसतात. त्यामुळे पुरंदर तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतीला व ग्रामसेवकांना फासे पारधी समाजाचे घरकुल योजनेचे प्रस्ताव पंचायत समितीकडे तात्काळ पाठविण्या बाबत लेखी आदेश द्या, ज्या पारधी समाजाच्या लाभार्थ्यांकडे जातीचा दाखला असेल किंवा शाळेच्या दाखल्यावर जात असून अशा लाभार्थ्यांना फासेपारधी विकास योजनेतून अथवा शबरी घरकुल योजनेतून घरकुल द्यावे व ज्यांच्याकडे जातीचा दाखला नाही, त्यांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल बांधून द्यावे अशी लेखी मागणी पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विष्णुदादा भोसले यांनी सांगितले.
ज्या लाभार्थ्यांकडे स्वत:हाची जागा नाही, त्यांना ग्रामपंचायतीच्या बखळ जागेतून किंवा पंडीत दीनदयाळ जागा खरेदी योजने अंतर्गत प्रस्ताव पाठविण्यात यावेत. फासेपारधी समाजाला शासनाच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या सर्व मुलभूत सोईसुविधा देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुका अध्यक्ष, पंढरीनाथ जाधव फासेपारधी रिपब्लिकन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, रिंकु पवार, अनिल भोसले, संदीप बेंगळे, मोहनराव ढगारे, नामदेव नेटके तसेच पारधी समाजाचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रति पुणे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद, तहसिलदार पुरंदर, सभापती पंचायत समिती पुरंदर, पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्या आहेत. या प्रश्नावर गंभीरतेने विचार न केल्यास फासेपारधी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)