हंडीनिमगांवला टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करा

सरपंच अण्णासाहेब जावळे यांची मागणी:
नेवासाफाटा – नेवासा तालुक्‍यातील श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर हंडीनिमगांव येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून या ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा. अशी मागणी सरपंच आण्णासाहेब जावळे यांनी केली आहे. याबाबत दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जावळे यांनी दिला आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, पाणी टंचाईबाबत तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी या भागातील पाणी टंचाई दूर व्हावी म्हणून पाटबंधारे विभागाला गावतळयात पाणी सोडले जावू नये असे पत्र दिले होते. मात्र त्या पत्राला देखील केराची टोपली दाखवून पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे
सध्या गावात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गरीब महिलांना सव कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही ग्रामस्थ गावातील खाजगी टॅंकर कडुन एक महिन्यापासून विकत पाणी घेत आहेत . गावातील डि.वाय.क्र.3 मायनर नं.1 चे सर्व शेतकरी पाण्यावाचुन वंचित राहिले आहेत आता पर्यंतच्या इतिहासात असे कधी घडले नव्हते असे सरपंच जावळे यांचे म्हणणे आहे
हंडीनिमगावामध्ये असलेले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान त्रिवेणीशवर देवस्थान येते येथे भाविक भक्तांना पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे गावातील ग्रामस्थ व माता भगीनींची त्रिव्र नाराजी या परीसरात आहे. तरी या युती शासनाने याबाबत दखल घेऊन पाण्याचे आवर्तन बंद झाल्यामुळे त्वरीत टॅंकरने पाणीपुरवठा करावा तसे आदेश तहसिलदार यांना देण्यात यावे तसे न झाल्यास ग्रामस्थ व जनावरे यांचे अतोनात हाल होणार आहे.
गेल्या पाच वर्षापूर्वी तत्कालीन आमदार शंकरराव गडाख यांनी धरणात कमी पाणी आहे. सुद्धा 350 बंधारे भरून दिले होते याची आठवण लोकांना येत असल्याचे सरपंच अण्णासाहेब जावळे पाटील यांनी सांगितले. तसेच याबत कार्यवाही न झाल्यास त्रिव आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरपंच आण्णासाहेब जावळे यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)