स्व. राजाभाऊंचे स्वप्न पूर्ण करणार… 

पाथर्डी शहराला विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून राज्यात पाहिले जावे असे स्वप्न स्व. राजीव राजळे यांनी पाहिले होते. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास करुन स्व. राजाभाऊंचे स्वप्न आम्ही पुढील काळात नक्‍कीच पूर्ण करणार आहोत. 

स्व. राजाभाऊंवर विश्‍वास टाकून शहरातील नागरिकांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. गेल्या एक वर्षाच्या कार्यकाळात पुढील पाच वर्षांचे शहर विकासाचे नियोजन आम्ही पूर्ण केले आहे. शहर हागणदारीमुक्‍त करण्यात नागरिकांनी सहकार्य केल्याने पाथर्डी नगरपरिषदेला एक कोटी रुपयाचे बक्षीस मिळाले आहे. शहराच्या हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयाच्या दर्जा सुधारण्यासाठी चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले. आगामी गणेशोत्सव काळात शहरात शांतता नांदावी, तरुणांना चांगल्या समाजहिताच्या कामात प्रोत्साहन मिळावे यासाठी आदर्श गणपती मंडळांना पुरस्कार दिले. यासर्व उपक्रमामधून तरुण वर्गाला पाथर्डी पालिकेशी जोडले. त्यामुळे समाजात हाच चांगला संदेश गेला. पालिका कारभार होताना लोकसहभागाशिवाय यश मिळू शकत नाही. हा एक चांगला संदेश शहरवासीयांमध्ये गेला.

लोकनेत्या ग्रामविकास मंत्री ना. पंकजा मुंडे, पालकमंत्री रामजी शिंदे, स्व. राजाभाऊ राजळे, आ. मोनिका राजळे यांच्या विशेष प्रयत्नातून पालिकेला मोठा निधी प्राप्त झालेला आहे. शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या स्व. गोपीनाथ मुंडे जॉगिंग पार्कचे काम प्रगतीपथावर आहे. शहरातील कै. माधवराव निऱ्हाळी सभागृहाच्या नूतनीकरणासाठी सुमारे 3 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच हे काम सुरु होणार आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 25 लाख लीटरची व 12 लाख लिटरची अशा दोन पाण्याच्या टाक्‍या बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रामगीरबाबा टेकडी परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी पर्यटन विकास योजनेतून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहराला पाणी पुरवठा करणारी जायकवाडी पाणी योजना कालबाह्य झाल्याने शहराला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यास वेळोवेळी अडचणी येत आहेत.

पुढील 25 वर्षाची निकड लक्षात घेऊन पाथर्डी शहरासाठी सुमारे 92 कोटी रुपयांची स्वतंत्र पाणी योजना प्रस्तावित केली आहे. आ. मोनिकाताईच्या पाठपुराव्यामुळे ही योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर या वर्षाअखेर या योजनेचे काम सुरु होण्याची शक्‍यता आहे. सांडपाणी व्यवस्थापनात शहर आदर्श मॉडेल बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरातील सर्व सांडपाणी एका ठिकाणी आणून त्यावर प्रक्रिया करुन त्याच शेतीसाठी वापर करण्याचा आमचा संकल्प आहे. सांडपाणी व्यवस्थापन योजनेचा अद्ययावत आराखडा बनवण्याचे काम सुरु आहे. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सध्या सुरु आहे. त्यात आणखी सुधारणा करुन सुक्‍या कचऱ्यापासूनही खत निर्मिती करण्याच्या प्रकल्प उभारणीबाबत प्रयत्न सुरु आहेत. त्याबरोबर शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, गटारी अशा मूलभूत सुविधा मिळणेसाठी पालिका पदाधिकारी व प्रशासन यांच्या प्रयत्नाने प्रश्‍न मार्गी लावले जात आहेत. पालिका कारभार पारदर्शक होऊन कारभारात लोकसहभाग वाढविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. स्व. राजाभाऊंनी स्वच्छ, सुंदर, हरित पाथर्डी शहराचे स्वप्न आम्ही आगामी काळात आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्‍चित पूर्ण करु.

 

 

डॉ. मृत्यूंजय गर्जे 
नगराध्यक्ष, पाथर्डी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)