स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने जाहीर केलेले ऊसतोड कामगार महामंडळ कुठे आहे?- धनंजय मुंडे

बीडच्या विजयी संकल्प सभेत धनंजय मुंडे यांची तुफान टोलेबाजी

ऊसतोड महामंडळावरून पालकमंत्री आणि सरकारला पुन्हा धरले धारेवर

-Ads-

बीड: ज्या स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपाला सत्तेवर बसवण्याचे काम केले त्यांच्या नावाने चार वर्षांपूर्वी जाहीर केलेले ऊसतोड कामगार महामंडळ कुठे आहे? मी परळीमध्ये त्याचे मुख्यालय दुर्बिण लावून शोधत असतो, असे म्हणत ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री आणि सरकारची पुन्हा एकदा गोची केली.

बीड येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खा.शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित विजयी संकल्प  सभेत धनंजय मुंडे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत तुफान टोलेबाजी करीत भाषण करून सभा जिंकून घेतली.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये शतकासाठी जशी शर्यत असते तसे भावाचे शतक कोणाचे आधी पूर्ण होते यावरून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची शर्यत सुरु असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला.

ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यात स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने महामंडळ काढण्याची घोषणा करून फसवणूक करण्यात आली. जिल्ह्याला कर्जमाफी मिळाली नाही, बोंडअळीचे नुकसान मिळाले नाही, पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली तरी त्याचे व्याज मात्र जिल्हा बँकेचे चेअरमन खात असल्याचा घणाघात त्यांनी केला.

जिल्ह्याला मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे, शेतकऱ्याला शेतात काही नाही, घरात काही नाही आणि सरकार फक्त घोषणा देण्याचे काम करत आहे. देशाच्या चौकीदारानेच १२५ कोटी जनतेला फसवले, आरक्षणाच्या नावावर मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजाला फसवले असल्याचे ते म्हणाले. आजच्या सभेने मागच्या सर्व सभांचे रेकॉर्ड ब्रेक झाले असून जिल्ह्यातील लोकसभेसह विधानसभेच्या सहाही जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)