स्व. उत्तमराव पाटील उद्यानांमधून साकारताहेत विविध प्रकारची उपवने 

मुंबई : राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दोन या पद्धतीने ६८ ठिकाणी स्व. उत्तमराव पाटील वन उद्यानांची निर्मिती होत असून यामधून फळवन, चंपकवन, कदंबवन, अशोकवन, आम्रवन, जंबुवन, वंशवन, मदनवृक्ष वन, चरक वन, लता वन, सारिका वन मगृसंचार वन, अतिथीवन यासारखी विविध प्रकारची उपवने साकारताहेत. प्रिय व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करून उद्यानांमधून स्मृतिवनेही निर्माण केली जात आहेत.

निरनिराळ्या वृक्षप्रजातींचे समूह निर्माण करण्यासाठी उद्यानात वेगवेगळी उपवने निर्माण करण्याला प्रोत्साहन देण्यात आले आहे. या माध्यमातून दुर्मिळ, औषधी आणि सुंदर वृक्ष प्रजातीचे जतन आणि संवर्धनही होत आहे. शहरांमधील नागरिकांमध्ये विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रजाती आणि वन्यजीवांविषयी आस्था निर्माण व्हावी, त्यांचे या गोष्टींकडे लक्ष आकर्षित व्हावे यासाठी त्यांना या उद्यानात अभ्यासाबरोबर क्रीडा-व्यायाम आणि मनोरंजनाची साधनेदेखील उपलब्ध करून दिली जात आहेत. वृक्ष-लतांचे महत्त्व आणि उपयोगिता सांगणारे पुस्तक संग्रहालय निर्माण करण्याचे व त्याद्वारे या सर्व माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्याचेही यात नियोजित आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)