स्वेच्छानिवृत्ती पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी चोरी

लोणी काळभोर- महाराष्ट्र पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेला पोलीस कर्मचारी आपल्या पत्नी समवेत पत्नीच्या जवळच्या नातेवाईकांच्या मुलाच्या लग्नाला गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे बंद दरवाजाचे कुलूप कापून आत प्रवेश करून बेडरूममधील कपाटाचे दार उचकटून लॉकरमध्ये ठेवलेली 50 हजार रुपये रोख रक्कम, 42 हजार 500 रुपये किंमतीचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने आणि 15 हजार रुपये किमतीचा एक एलसीडी टिव्ही असा एकूण 1 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना ऊरूळी देवाची येथे घडली आहे. याप्रकरणी सुमन रामचंद्र साळुंखे (वय 54, रा. श्री स्वामी समर्थनगर, बाजारेमळा, वडकी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सुमन यांचे पती रामचंद्र यांनी महाराष्ट्र पोलीस दलातून सन 2017 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली असल्याने सध्या ते घरीच असतात. त्यांचे घराशेजारी त्यांचा मुलगा आपली पत्नी आणि मुलीसमवेत रहातो. सुमन साळुंखे यांचे चुलत भावाच्या मुलाचे लग्न निंबुत (ता. बारामती) येथे असल्याने त्या घराला कुलूप लावून आपल्या मुलाला सांगून पतीसमवेत गेल्या होत्या. त्या विवाह सोहळ्यात असताना त्यांच्या मुलाने फोन वरून संपर्क साधून घराचे दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले.
त्या तात्काळ पतीसमवेत घरी येऊन पाहणी केली असता त्यांना मुख्य गेट आणि दरवाजाचे कुलूप कापलेले दिसले. आत बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील सर्व साहित्य आणि कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि पैसे ठेवलेली पेटी फरशीवर पडलेली दिसली. यामुळे घरात चोरी झाली असल्याची त्यांना खात्री पटल्यानंतर त्यांनी व्यवस्थित पाहणी केली असता त्यांना लॉकर मध्ये ठेवलेले 50 हजार रुपये रोख रकमेसहीत 15 हजार रूपये किंमतीची 1 तोळे वजणाची चेन, 15 हजार रुपये किंमतीची 1 तोळे वजणाची अंगठी, 15 हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी अर्धा तोळे वजणाच्या दोन अंगठ्या, 7 हजार 500 रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाचे कानातील झुमके असे एकूण साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 15 हजार रुपये किंमतीचा एक एलसीडी टिव्ही असा एकूण 1लाख 27 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज मिळून आला नाही. म्हणून त्यांनी अज्ञात चोरट्यांविरोधांत तक्रार दिली आहे. याच दरम्यान कानिफनाथ नगर, जाधव मळा, वडकी येथे राहणाऱ्या प्रेमवती रतनकुमार मुदलियार यांचे घरी अशाच प्रकारे चोरी झाली असून याबाबत अद्याप फिर्याद देण्यात आलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)