स्वीस बॅंकेतील भारतीयांच्या काळ्यापैशाच्या वाढीने सरकार चक्रावले

अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी केली सारवासारव


म्हणाले तो सगळाच पैसा काळा असण्याची शक्‍यता नाही, तरी पण कारवाई करू

नवी दिल्ली – विदेशातील काळापैसा हा भाजपचा निवडणूक मुद्दा होता. हा पैसा परत मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू असल्याचे दावेही या सरकारकडून केले गेले. पण काल स्वीस बॅंकेमधील भारतीयांच्या काळ्यापैशात 50 टक्के वाढ झाल्याची बातमी सर्वत्र प्रकाशित झाल्याने सरकारची मात्र चांगलीच नाचक्की झाली असून त्यावरून सरकारच्या विरोधात सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे.

या पार्श्‍वभूमीवर अर्थमंत्रालयाचा कारभार हंगामी स्वरूपात सांभाळत असलेले केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटले आहे की स्वीस बॅंकेत जमा असलेला हा साराच पैसा काळा असण्याची शक्‍यता नसावी पण आम्ही या विषयी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करू

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2017 साली स्वीस बॅंकेत जमा झालेली भारतीय नागरीकांची रक्कम ही सुमारे 7 हजार कोटींवर गेली आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिली तीन वर्षे या बॅंकेतील भारतीयांनी ठेवलेल्या पैशावर कारवाई होण्याच्या भीतीने हे पैसे संबंधीत खातेदारांकडून मोठ्या प्रमाणात काढून घेतले जात होते. पण या वर्षात मात्र ते अचानक पुन्हा वाढले आहेत.

या संबंधात बोलताना पीयुष गोयल यांनी म्हटले आहे की भारताचा स्वीस सरकारशी माहिती देवाणघेवाणीचा करार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2018 पासूनची माहिती आपल्याला मिळू शकेल. त्यात कोणत्या खात्यावर किती रक्कम जमा झाली आहे याचा तपशील भारत सरकार मागवून घेईल. त्याचा तपशील आल्यावरच हा पैसा बेकायदेशीर व्यवहारातील पैसा आहे किंवा कसे याची माहिती मिळू शकले असे गोयल यांनी सांगितले.

यातील 40 टक्के निधी हा लिबरल रिमीटन्स स्कीम अंतर्गत जमा झालेला असू शकतो असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. तथापी आम्ही पुर्ण चौकशी करून जो कोणी दोषी आढळेल त्यावर आम्ही कारवाई करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)