स्वीत्झर्लंडमध्ये रणवीरच्या नावाची ट्रेन

रणवीर सिंह सध्या स्वीत्झर्लंडच्या अतिशय सुंदर वातावरणामध्ये आपल्या सुटीचा आनंद उपभोगतो आहे. स्वीस टुरिझम डिपार्टमेंटनेही पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी रणवीरच्या या वास्तव्याचा उपयोग करून घेण्याचे ठरवले आहे.

स्वीत्झर्लंडच्या पर्यटनासाठी रणवीरला अधिकृतपणे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर करून घेतले गेले आहे आणि आता तर रणवीरच्या नावे तेथे एक खास ट्रेन सुरू केली जाणार आहे. त्या ट्रेनचे नाव असणार आहे, “रणवीर ऑन टूर’. ज्याच्या नावे स्वीत्झर्लंडमध्ये खास ट्रेन सुरू केली जावी, असा रणवीर हा पहिला यंग स्टार आहे. स्वीत्झर्लंडमध्ये रणवीच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि त्याचे बहुतेक सिनेमे तिने अगदी हिट होत असतात.

गेल्या वर्षी मार्चमध्येही रणवीर सुटी घालवण्यासाठी स्वीत्झर्लंडला गेला होता. तेथे बर्फाच्या राशींमध्ये त्याने एक व्हिडीओ करून पोस्टही केला होता. स्वीत्झर्लंड हा रणवीरचा आवडता देश आहे. तिथे कितीही वेळा गेले तरी प्रत्येक वेळी काही तरी नवीन बघायला मिळते, असे रणवीर म्हणतो. यंदा तो लेक जेनेवा भागात गेला आहे. तिन्ही बाजूंनी बर्फाच्छादित डोंगर, झरे आणि युनेस्को या यादीतील लावीक्‍स असलेल्या भागाला स्वीत्झर्लंडचा दागिनाच म्हटले जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)