स्वीडनमध्ये उभारला इलेक्ट्रिक रस्ता; वाहने आपोआप होणार चार्ज

स्टॉकहोम : जगातील पहिला इलेक्ट्रिक रस्ता स्वीडनमध्ये उभारला आहे. जगभरात इंधनांचे दर गगनाला भिडले असल्याने वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रिक वाहने विकसित केली जात आहेत. त्यांच्या सोयीसाठी हा रस्ता आहे. सध्या प्रायोगिक स्तरावर हा २ किमी लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या यंत्रणेला प्रतिकिलोमीटर १.२ दशलक्ष डॉलर्सचा खर्च येतो.

स्वीडनमधील या रस्त्यावर इलेक्ट्रिक रूळ टाकले असून त्यावरून जाणार्‍या इलेक्ट्रिक कार आणि ट्रकची बॅटरी चार्ज करता येऊ शकते. स्टॉकहोमजवळ हा रस्ता खुला करण्यात आला आहे. देशातील सरकारी योजनेतून हा अनोखा रस्ता तयार करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास स्वीडनमध्ये २० हजार किलोमीटरचे असे रस्ते आणि हायवे साकारले जाणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)