स्वीडनच्या कार्निव्हलमध्ये मराठमोठ्या ढोलताशाचा गजर

लॅंड्‌सक्रोना (स्वीडन) – स्वीडनमधील जगप्रसिद्ध कार्निवलमधील सर्व पाश्‍चात्य कला अविष्कारांमध्ये मराठी ढोल-ताशा प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला.

युरोपखंडातील स्वीडनमधील लॅंड्‌सक्रोना या शहरात दर वर्षी उन्हाळ्यात तीन दिवसांचा कार्निवल असतो. त्यावेळी जगभरातून वेगवेगळ्या देशांतील कलाकार येऊन आपापल्या कलेचे प्रदर्शन करतात. या कार्निवलचा महत्वाचा भाग म्हणजे कार्निवल ट्रेन किंवा कार्निवल मिरवणूक. कार्निवल ट्रेन संपूर्ण शहराला संगीतमय करते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षी कार्निवल ट्रेन मध्ये साधारण 20 नृत्याविष्कार सादर केले गेले. थाई डान्स, लॅटिन सांबा डान्स, ईंडोनेशिया डान्स, न्यूयॉर्क डान्स, बॉलीवूड डान्स, फायर फ्लो ओरिएंटल डान्स अशा काही प्रमुख डान्स प्रकारांचे सादरीककरण करण्यात आले.

त्यामध्ये लूंड या शहरातील हौशी मराठी मंडळींनी या वर्षी स्कोने ढोल-ताशा मंडळ स्थापन केले. स्कोने ढोल-ताशा मंडळाने कार्निवल ट्रेन मध्ये मराठी ढोल, ताशा, लेझीम आणि झान्ज खेळून मराठी परंपरेचे दिमाखदार प्रदर्शन केले. कार्निवल ट्रेन सुरु झाल्यापासून म्हणजे 1992 पासून असे प्रदर्शन पहिल्यांदा केले गेले. सर्व बायकांनी नऊवारी साडी-नथ-फेटा असा मराठमोळा वेष परिधान केला होता, तर पुरुषांनी पांढरा झब्बा आणि जीन्स असा पोशाख परिधान केला होता.

जीन्स-झब्बा-फेटा असा वेष परिधान केलेली मुलेही मागे नव्हती. लॅंड्‌सक्रोनाचा परिसर ढोल-ताशा च्या आवाजाने, तसेच गणपती बाप्पा मोऱ्या, जय भवानी-जय शिवाजी, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… यासारख्या अनेक मराठी घोषणांनी दुमदुमून गेला होता. युरोपीय रहिवास्यांनी ढोलाच्या ठेक्‍यावर ताल धरत, मराठी वेषभूषेचे कौतुक करत मराठी मंडळींना उस्फुर्त दाद दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)