स्वीकृतसाठी लॉबिंग आणि फिल्डिंग

नगर: महापालिकेतील स्वीकृत सदस्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, स्थानिक नेत्यांकडे लॉबिंग करण्यात येत आहे. पक्षीय संख्याबळानुसार एकूण 5 स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्यात येणार आहेत. शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 व भाजप 1 असे, स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहेत. महापौरांकडून महासभेचा अजेंडा काढल्यानंतर पहिल्याच महासभेत या नियुक्‍या केल्या जाणार आहेत.

महापालिकेचे 68 सदस्य आहेत. या सभागृहासाठी पाच स्वीकृत नगरसेवक संख्या निश्‍चित करण्यात आलेली आहे. शिवसेनेच्या 24 नगरसेवक संख्याबळानुसार त्यांच्या वाट्याला 2 स्वीकृत नगरसेवकपदे येतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसने एका अपक्षासह 19 नगरसेवकांची गटनोंदणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्याही कोट्यातून 2 स्वीकृत सदस्य घेतले जाणार आहेत. भाजपची 14, कॉंग्रेस 5 व बसपा 4 सदस्यांची गटनोंदणी झाली आहे. भाजपला एक स्वीकृत नगरसेवकपद मिळणार असून कॉंग्रेस व बसपाचा विचार होणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वीकृत सदस्यासाठी राष्ट्रवादीकडून शहरजिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, सुरेश बनसोडे, संजय घुले, नीलेश बांगरे यांची, तर शिवसेनेकडून दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, रवी वाकळे, हर्षवर्धन कोतकर, कलावती शेळके यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून सुवेंद्र गांधी, किशोर डागवाले यांच्या नावाचा विचार सुरू आहे. एका स्वीकृत नगरसेवकांचे मूल्य 13.6 होते. शिवसेनेचे 24 सदस्य असल्याने त्यांची 1.76 संख्या येते. राष्ट्रवादीची 19 संख्या असून त्यांचे मूल्यांकन 1.39 येते, तर भाजपचे 14 संख्या असून 1.02 मूल्यांकन येते. कॉंग्रेसची 5 संख्या असून मूल्यांकन 0.36 व बहुजन समाज पक्षाची 4 संख्या असून 0.29 होते. त्यामुळे या दोन्ही पक्षाचा “स्वीकृत’साठी विचार होणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)