स्विस बॅंकांमधील जमेवरून टीका…

स्विस बॅंकांमधील काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रूपये जमा करण्याचे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये दिले होते. नोटांबदीमुळे भारतातूून काळा पैसा हद्दपार होईल, असे मोदी 2016 मध्ये म्हणाले. आता 2018 मध्ये ते स्विस बॅंकांमध्ये काळा पैसा नाही तर भारतीयांनी पांढरा पैसा ठेवल्याचे म्हणत आहेत.
राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष

नोटाबंदीच्या माध्यमातून जनतेला दिलेल्या यातनांबद्दल मोदी सरकारने माफी मागावी. स्विस बॅंकांमध्ये भारतीयांनी जमा केलेल्या पैशांमध्ये वाढ झाल्याने नोटाबंदीचा पर्दाफाश झाला आहे. जनतेला केवळ त्रास झाला. नोटाबंदीतून काहीच लाभ झाला नाही. त्यामुळे मोदी सरकारने जनतेची माफी मागणे आवश्‍यक आहे.
पिनरयी विजयन, केरळचे मुख्यमंत्री

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वित्झर्लंडने बॅंकांमधील खात्यांचा तपशील उघड करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्विस बॅंकांमध्ये काळा पैसा ठेवणाऱ्या भारतीयांवर संबंधित कायद्यातील तरतुदींतर्गत कडक कारवाई करण्यात येईल. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी विविध पाऊले उचलण्यात येत असल्याने आगाऊ कर भरण्यात वाढ झाली लक्षणीय प्रमाणात आहे.
अरूण जेटली, केंद्रीय मंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)