स्विस बँकेतील काळा पैसा पांढरा झाला का?; काँग्रेसचा मोदींना सवाल

नवी दिल्ली: स्विस बँकेतील भारतीयांच्या पैशात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. मोदी पंतप्रधान होण्याआधी जो पैसा काळा होता, तो 49 महिन्यांमध्ये पांढरा झाला, अशा शब्दांमध्ये काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे.

‘मे 2014 च्या आधी स्विस बँकेतील पैसा काळा होता. मोदी सरकारच्या 49 महिन्यांच्या सत्ताकाळात मात्र हा पैसा पांढरा झाला आहे,’ असे ट्विट करत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. स्विस बँकेतील भारतीयांच्या काळ्या पैशात वाढ झाल्याचे वृत्त येताच मोदी सरकारमधील दोन वरिष्ठ मंत्री सरकारच्या बचावासाठी पुढे आले. यावरुनही सुरजेवाला यांनी सरकारवर शरसंधान साधलं. ‘एकाचवेळी दोन अर्थमंत्री (?) स्विस बँकेतील खातेधारकांच्या बचावासाठी पुढे आले. हा पैसा बेकायदा नसल्याचं दोघेही मंत्री सांगत आहेत,’ असे सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्विस बँकेतील सर्व पैसा काळा नसल्याचं म्हणत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारचा बचाव केला होता. या विधानाचाही सुरजेवाला यांनी समाचार घेतला. स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीयांच्या खात्यातील रकमेत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे स्विस बँकेतून काळा पैसा भारतात आणू म्हणणाऱ्या सरकारनं देशातील काळा पैसा भारताबाहेर घालवला, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)