स्विफ्ट कार पलटी होवून युवती ठार

तारळी पुलानजीकची घटना; दोघे जखमी

उंब्रज – उंब्रज, ता. कराड येथील राष्ट्रीय महामार्गावरील तारळी नदीच्या पुलाजवळील धोकादायक वळणावर भरधाव वेगाने जाणार्‍या स्विफ्ट कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कोलांट्या खावून महामार्गावर पलटी झाली. या अपघातात 25 वर्षीय युवती ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीनचे सुमारास घडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अपघातात अन्य दोघेजण जखमी झाले आहेत.संगिता सुरेश गवस (वय 25) रा. मुंबई असे अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव आहे. तर अक्षय संतोष गवस (वय 20), शेजल संतोष गवस (वय 50) असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गवस कुटुंब हे मूळचे गोवा येथील रहिवासी असून ते सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहेत. गोव्यावरुन मुंबईला परतत असताना ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरुन कराड ते सातारा लेन वरुन स्विप्ट कार निघाली होती. दुपारी 3.30 च्या सुमारास उंब्रज, ता. कराड येथील तारळी नदीच्या धोकादायक वळणावर कार चालकाचा ताबा सुटल्याने कार महामार्गावर पलटी झाली. यामध्ये डोक्यास गंभीर मार लागल्याने संगीता गवस या युवतीचा मृत्यू झाला. तर अक्षय गवस व शेजल गवस हे या अपघातात जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत उंब्रज पोलीस ठाण्यात झालेली नव्हती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)