स्विप्ट डिझायरने कोपरी टोलनाक्‍यावर घेतला पेट

ठाणे – रस्त्यावरच गाडीने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या स्विप्ट डिझायरने टोलनाक्‍यावर पेट घेतला. या अचानक लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

कोपरी परिसरात असलेल्या टोलनाक्‍यावर सोमवारी 7 वाजण्याच्या सुमारास ही गाडी टोलनाक्‍यावर थांबली होती. मात्र अचानक कारने पेट घेतल्याने टोल कर्मचाऱ्यांची एकच धावपळ झाली. दरम्यान कारच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी आणि टोल कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले आणि त्यांनी प्रयत्नांची शर्थ करीत आगीवर नियंत्रण मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)