स्विझर्लंडच्या राष्ट्राध्यक्षा भारतभेटीवर

नवी दिल्ली : स्विझर्लंडच्या राष्ट्राध्यक्षा डोरिस लिउथार्ड ह्या आज भारतात दाखल झाल्यात. याप्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदींनी त्यांचे राष्ट्रपती भवन येथे त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांना दिमाखदार सोहळ्यात मानवंदना देण्यात आली. नंतर राजघाट येथे भेट देऊन त्यांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी दोन्ही देशामध्ये परस्पर सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधानांनी पत्रकार परिषदेमध्ये द्विपक्षीय करार यशस्वीपणे चालू राहो असा विश्वास व्यक्त केला.  पॅरिस करारासाठी दोन्ही देश मिळून काम करूयात असे मत मोदींनी व्यक्त केले.  २०२२ मध्ये १७५GW सौर ऊर्जा निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.
स्विझर्लंडच्या निरंतर सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केलेत आणि त्यांची ही यात्रा सफल होवो अशी प्रार्थना केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)