स्विंग ट्रेडिंग म्हणजे बाजारातील प्रत्येक हेलकाव्यावर स्वार होणं व तो हेलकावा संपताना त्यातून बाहेर पडणं. म्हणजेच शेअर्सचे भाव वर जात असताना त्या आंदोलनाच्या सुरुवातीस खरेदी करणं व ते आंदोलन संपायच्या वेळेस त्यातून बाहेर पडणं. आता अशा प्रकारात जोखीम ही जास्त असते परंतु मिळणारा नफा देखील आकर्षक असू शकतो.
दोन आठवड्यापूर्वीच्या म्हणजेच १९ ऑक्टोबरच्या लेखात वर्तवल्याप्रमाणं निफ्टी ५० ही १०८५० पर्यंत जाऊ शकेल असं अनुमान काढलं होतं आणि निफ्टी ५० गेल्या शुक्रवारी बंद होताना १०८७६ अंशावर बंद दिलेला आहे.अशाप्रकारे, नोव्हेंबर महिन्यात निफ्टी ५० ने ७.५ % परतावा दिलेला आहे. तर, त्याच लेखात खरेदीसाठी सुचवलेल्या बहुधा सर्व कंपन्यांनी ५% च्या आसपास परतावा दिलेला आहे. खालील तक्ता पहा.
तक्त्यात आयडियाचा शेअर ४५.५ रुपयांवर जाऊन मग पार ३५ रुपयांपर्यंत घसरला. सांगायचा मुद्दा हाच आहे की येणाऱ्या दिवसांत नफेखोरीवर जास्त भर असणं गरजेचं आहे. जर आपल्या उद्दिष्टानुसार एखाद्या शेअरमागं नफा होत असेल तर तो पदरात पडून घेण्यातच शहाणपण आहे (अन्यथा आयडिया सारखा तो शेअर गळ्यात पडू शकतो).
स्विंग ट्रेडिंग – हेलकाव्यांवर स्वार होण्याचा मार्ग (भाग-२)
आतापुढील दोन – तीन आठवडे बाजार हा हेलकावे देऊ शकतो याचं कारण म्हणजे पांच राज्यातील निवडणुकांचे निकाल हे एकाच दिवशी म्हणजे ११ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत त्यामुळं बाजारातील अस्थिरता निश्चित आहे. मग अशा परिस्थितीत काय करायचं तर एक तर छोटे छोटे नफे पदरात पडून घेणं.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा