स्विंग ट्रेडिंग – हेलकाव्यांवर स्वार होण्याचा मार्ग (भाग-२)

स्विंग ट्रेडिंग म्हणजे बाजारातील प्रत्येक हेलकाव्यावर स्वार होणं व तो हेलकावा संपताना त्यातून बाहेर पडणं. म्हणजेच शेअर्सचे भाव वर जात असताना त्या आंदोलनाच्या सुरुवातीस खरेदी करणं व ते आंदोलन संपायच्या वेळेस त्यातून बाहेर पडणं. आता अशा प्रकारात जोखीम ही जास्त असते परंतु मिळणारा नफा देखील आकर्षक असू शकतो.

स्विंग ट्रेडिंग – हेलकाव्यांवर स्वार होण्याचा मार्ग (भाग-१)

मागील एका लेखात ट्रेडिंगबद्दल जाणून घेतलंय तर पुढील दोन लेखांत आपण ट्रेडिंगच्या एका प्रकारांविषयी जाणून घेऊयात व त्याचा उपयोग हेलकावे खाणाऱ्या बाजारात (volatile) कसा करून घायचा ते पाहण्याचा प्रयत्न करूयात. यास प्रचलित शब्द आहे स्विंग ट्रेडिंग म्हणजे बाजारातील प्रत्येक हेलकाव्यावर स्वार होणं व तो हेलकावा संपताना त्यातून बाहेर पडणं. म्हणजेच शेअर्सचे भाव वर जात असताना त्या आंदोलनाच्या सुरुवातीस खरेदी करणं व ते आंदोलन संपायच्या वेळेस त्यातून बाहेर पडणं. आता अशा प्रकारात जोखीम ही जास्त असते परंतु मिळणारा नफा देखील आकर्षक असू शकतो.

यासाठी एक मजेशीर बाब म्हणजे १ जानेवारी २०१८ रोजी निफ्टी ५० ही १०५०० होती व आज १०८७६ आहे, म्हणजे केवळ ३७६ अंश. परंतु खाली दिलेल्या आलेखात दर्शवल्याप्रमाणं जाने. २०१८ पासून आत्तापर्यंत जर प्रत्येक आंदोलनावर स्वार झाल्यास व योग्य वेळेस त्यातून बाहेर पडल्यास अशा नफ्याच्या अंशांची संख्या ७७१५ अंश होईल.

वरील आलेखात १ या ठिकाणी तो शेअर (येथे निफ्टी फ्युचर्स) खरेदी करून २ या ठिकाणी विकणे व तेथे पुन्हा शॉर्ट सेलिंग करणे व हे विकलेले शेअर्स  ३ च्या ठिकाणी खरेदी करणे म्हणजे तो शॉर्ट सेलिंगचा व्यवहार पूर्ण होईल व त्याठिकाणी नवीन खरेदी करणे, ४ च्या ठिकाणी विकण्यासाठी, असं १० पर्यंत करत राहणं.म्हणजे प्रत्येक आंदोलनात आपला योग्य सहभाग राहू शकतो. खालील तक्त्यात याप्रमाणे खरेदी विक्री व अंशांमध्ये मिळालेला नफा दर्शविला आहे.

अगदी बाजारातील कलाचा (अचूक तळ व शिखर) अचूक अंदाज येत नसला तरी कांही तांत्रिक अभ्यासानुसार यांमधून चांगला नफा कमावता येऊ शकतो. कारण दोलायमान बाजाराशी हात मिळवणी करण्याचा काळ सुरु होतोय. अशा स्विंग ट्रेडिंगसाठी माझ्या मते एखाद्या शेअर्समध्ये ट्रेडिंग करण्यापेक्षा निफ्टी फ्युचर्समध्ये व्यवहार करणं कमी जोखमीचं असतं याची प्रमुख दोन कारणं म्हणजे बाजार उघडताना कधीही २ ते ३ टक्क्यांपेक्षा जास्त वर अथवा खाली उघडत नाही परंतु एखाद्या कंपनीबाबतच्या नकारात्मक घडामोडीमुळं तो शेअर एकाच दिवसात तब्बल ४०% , ३१% देखील कोसळू शकतो (ताजं उदा. घ्यायचं तर डीएचएफएल व येस बँक)तर अशी शक्यता निफ्टी५० च्या बाबतीत अशक्यप्राय वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणते यातील रोज असलेली तरलता. वायदे बाजारात अशी पोझिशन साधारणपणे १ महिना संपूर्ण पैसे न भरता ठेवता येते. (आपल्या ब्रोकरकडून याबाबत अधिक मार्गदर्शन घ्यावं).

१०६०० – १०६५० ह्या पातळ्यांचे अडथळे पार केल्यावर निफ्टी ५० ने नवव्या सत्रात आपलं पुढील १०८५० हे उद्दिष्ट पार केलं. आता निफ्टी ५० चं यापुढील उद्दिष्ट ११०९० व ११३९० असू शकतं, तर १०७३० व १०६०० हे प्रामुख्यानं आधार संभवतात.

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणं दोन आठवडयांनी लागणाऱ्या निवडणुकांचा निकाल आपल्या गुंतवणुकीचा निकाल न लावता त्यावेळी बाजारात असणाऱ्या दोलायमान परिस्थितीचा उपयोग कमीतकमी जोखीम घेऊन आपल्या फायद्यासाठी कसा करायचा हे आपण पुढील लेखात पाहू.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)