स्वास्थ्य विचार – वैद्यभूषण पुरुषोत्तमशास्त्री हिर्लेकर

स्वास्थ्यविचार हे वैद्यभूषण पुरुषोत्तम शास्त्री हिर्लेकर यांचे आरोग्याचा विचार करणारे पुस्तक आहे. ते अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रचारक मंडळाच्या आरोग्य विभागाचे प्रमुख आहेत. या पुस्तकात प्रामुख्याने आहार, आचार, शरीरप्रवृत्ती, दिनचर्या, निद्रेचे प्रमाण, मलोत्सर्जन, दंतधावन व नेत्रप्रक्षालन, धूम्रपान, सार्वदेहिक स्वच्छता, अभ्यंग, व्यायाम व त्याचे प्रकार, स्नान, आहार, मांसाहार, धान्याहार, दूध, मसालेदार मधुकर पदार्थ, मसालेदार तिखट पदार्थ, मसालेदार आंबट पदार्थ, आहारविषयक सामान्य नियम, चहा, कॉफी, निद्रा, ब्रह्मचर्य, हवा व प्रकाश, व्यायाम, ऋतुचर्या, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक आरोग्य यांचा विचार केलेला आहे. या सगळ्या लेखणाला आयुर्वेद आधारभूत आहे असे लेखकाचे सांगणे आहे.

“ज्यांना जितके नियम पाळता येतील तितके पाळावे आणि शक्‍य तितका अधिक लाभ व्हावा’ अशी भूमिका पुस्तकाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. लेखकाच्या मतांसंबंधी वाचल्यानंतर जाणकार वाचकांनी डॉक्‍टरांचा सल्ला घेऊनच कृती कराव्यात. स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी ही पुस्तके नाहीत. आरोग्याच्या संदर्भात पटेल, झेपेल आणि पचेल तेवढेच घ्यावे. मिळमिळीत अवघेची टाकोनी द्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)