स्वावलंबन विमा योजना सुरु करण्याची मागणी

पिंपरी – केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अपंगांसाठी सुरू केलेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना तडकाफडकी बंद करण्यात आली आहे. प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची दिल्लीत भेट घेत ही योजना पुन्हा सुरु करण्याचे निवेदन देण्यात आले.

या वेळी वर्ध्याचे खासदार रामदास तडसे उपस्थित होते. याबाबत वेळोवेळी “प्रहार अपंग क्रांती आंदोलन’ पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला; परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दिल्लीत जाऊन स्वावलंबन आरोग्य विमा योजना हिस्सा न दिल्याने बंद केली. योजनेत लाखो अपंगांनी पैसे भरले आहेत व योजनेचा लाभ न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी अपंगांना देत नाही, ही बाब “प्रहार’ चे राजेंद्र वाक्‌चौरे यांनी मंत्री रामदास आठवले यांच्या निदर्शनास आणून दिली.

ही बाब गंभीर असल्याने आठवले यांनी तत्काळ सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत बैठक घेण्याचे आदेश दिले. या वेळी प्रहार पिंपरी-चिंचवड अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, रामचंद्र तांबे, अहमदनगर अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, वर्धा अध्यक्ष प्रमोद कुऱ्हाटकर, चांद शेख, संभाजी कुडे, हमीद शेख, सिद्धार्थ उरकुडे, राजेश सावरकर आदी “प्रहार’चे महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

तत्पूर्वी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना भेटून आपली व्यथा मांडली. या वेळी सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करून देशातील अपंगांना न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)