स्वार्थी लोकांकडून अफवा पसरवण्याचे काम

प्रभाकर घार्गे : कराड अर्बन बॅंक सक्षम

कराड, दि. 3 (प्रतिनिधी) – कराड अर्बन बॅंकेने आजवर सामाजिक बांधिलकी मानून अर्थकारण केले आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम जिल्ह्यातील ही एकमेव शेड्युल्ड सहकारी बॅंक असल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे उद्‌गार खटाव माण तालुका ऍग्रो प्रोससिंग लि.चे अध्यक्ष माजी आ. प्रभाकर घार्गे यांनी काढले.
वडूज येथे कराड अर्बन बॅंकेच्या वतीने आयोजीत सभासद-ग्राहक प्रशिक्षण मेळाव्याप्रसंगी बोलत होते. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, संचालक आणि दादासाहेब गोडसे, वडूज शाखेचे सल्लागार हिंदुराव गोडसे, प्रदीप शेटे, नंदकुमार पवार, गिरीश शहा, गजकुमार दोशी यांच्यासह पुसेगाव, दहिवडी, म्हसवड व पुसेगाव शाखांचे सल्लागार, ग्राहक, सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. प्रभाकर घार्गे म्हणाले की, काही मंडळी स्वार्थी हेतूने बॅंकेबद्दल काही अफवा पसरवत आहेत, त्यावर ग्राहकांनी विश्‍वास ठेवू नये.
सुभाषराव जोशी म्हणाले की, बॅंकेबद्दल ग्राहकांच्या मनात प्रेम आहे. अफवा पसरवणारे पसरवतात पण त्यामुळे ग्राहकांवर कोणताही परिणाम झाला नाही. बॅंका, पतसंस्था बंद पडल्या की लोकांना असुरक्षित वाटते. लोक धास्तावतात. पण ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. बॅंक सक्षम असून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करायला आम्ही तयार आहोत.
डॉ. सुभाष एरम म्हणाले, सध्या बॅंकेविषयी ग्राहकांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. यापुढे शाखा वर्धापन दिनानिमित्त ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी सुरूवातीला स्वागत व प्रास्ताविक केले. विजय काकडे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)