स्वारगेट-सातारा रस्ता : ‘बीआरटी’चा बदलतोय ‘लूक’

पुणे – पुणे स्ट्रीट प्रोग्राम अंतर्गत स्वारगेट ते सातारा रस्त्याची फेररचना करण्यात येत आहेत. यांतर्गत 5.4 किमी अंतराच्या या मार्गावरील “बीआरटी’ थांब्यांची रचनाही बदलण्यात येत आहे. त्यामुळे आता स्वारगेटपासून कात्रजपर्यंत प्रवास सुसाट होणार आहे. या प्रकल्पाची माहिती देणारा “प्रभात’चा दृष्टीक्षेप.

काय होणार नेमके बदल?
स्वारगेट ते सातारा रस्त्यावरील बीआरटीचे बसथांब्यांची रचना आता नगर रस्त्यावरील थांब्यांप्रमाणे होणार आहेत. या शिवाय, पहिल्यांदाच बीआरटी थांब्यांवर जाहिरात केली जाणार आहे. बसथांब्यांवरील बाजूस चारही दिशांना जाहिरात पॅनेल असणार आहे.

बीआरटी थांब्यांची रचनाही बदलणार
नेहमीच वर्दळीच्या असलेल्या सातारा रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी 74 कोटी रुपयांचा खर्च येणार असून या रस्त्यावर पदपथ, सायकल ट्रॅक तसेच वाहतुकीसाठी स्वतंत्र लेन आणि मध्यभागातून बीआरटी मार्ग असणार आहे. जंगली महाराज रस्त्याच्या धर्तीवर हा रस्ता विकसित केला जात आहे. त्यामुळे या रस्त्यावरील मध्यभागी असलेल्या बीआरटी थांब्यांची रचनाही बदलण्यात येणार आहे.

यापूर्वी काय होते?
सातारा रस्त्यावरील बीआरटी थांब्यांवर सध्या डाव्या आणि उजव्या बाजूने चढ-उतरण्यासाठी जागा आहे. त्यात बदल करून आता चढण्या-उतरण्यासाठीचे मार्ग दोन्ही बाजूस बसथांब्यांच्या मध्यभागी करण्यात येणार आहेत. या बसथांब्यांना स्वयंचलित दरवाजे लावले जाणार आहेत. या शिवाय, पहिल्यांदाच या थांब्यांवर वरील बाजूस जाहिरात फलक उभारले जाणार आहे. या संपूर्ण मार्गावर 9 बसथांबे असून त्यांच्या रचनेत बदल करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

प्रकल्प
पुणे स्ट्रीट प्रोग्राम
———-
5.4 किमी
एकूण अंतर
————
एकूण खर्च
74 कोटी रुपये
———–
नगर रस्ता “बीआरटी’
प्रमाणे असणार रचना
————
9 बसथांबे
पालिका उभारणार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)