स्वारगेट परिसरात दोन तरूणांना लुटणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी

पुणे- रस्त्यामध्ये आडवून मारहाण करून दोघांना लुटल्याप्रकरणात स्वारगेट पोलिसांनी तिघांना
अटक केली. न्यायालयाने तिघांना 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
सुरज शाहु डोलारे (वय 19), प्रविण ब्रह्मदेव डोलारे (वय 24), अमोल अभिमान कदम (वय 28, तिघेही रा. पर्वती पायथा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत राम दशरथ तुरे (वय 26, रा. शिवाजीनगर गावठाण, मुळ रा. चामरगा, जि. लातुर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 1 ऑगस्ट रोजी स्वारगेट परिसरात घडली.
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तुरे हे त्यांच्या इतर 5 मित्रांसह स्वारगेट येथून सारसबागेकडे असलेल्या अण्णा भाऊ साठे पुतळ्याकडे चालले होते होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाजवळ आडवून मारहाण केली. त्यांच्याकडील 3 हजार रुपये आणि मित्राकडील 4 हजार, असे एकुण सात हजार रुपयांची जबरी चोरी केली. याप्ररणी तिघांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यासाठी, अशा स्वरूपाचे इतर गुन्हे त्यांनी केले आहेत का?, त्यांचे इतर कोणी साथीदार आहे का, याचा शोध घेण्यासाठी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने तिघांना कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)