स्वारगेट ते कापूरहोळ पीएमपीएल बस सुरू

  • पाच बसगाड्यांच्या एकूण चोपन्न फेऱ्या होणार

कापूरहोळ – गेल्या अनेक वर्षांपासून कापुरहोळ ते स्वारगेट पीएमपीएल बससेवा सुरू करण्याची मागणी होती. कापूरहोळ पंचक्रोशी तसेच महामार्गावरील लहान मोठ्या गावांची मोठी गैरसोय होत होती. पीएमपीची बससेवा आज (दि. 4) पासून कापुरहोळ ते स्वारगेट अशी सुरू करण्यात आली. या गाडीच्या रोज चोपन्न फेऱ्या होणार आहेत.कापुरहोळ येथून आज सकाळी 11 वाजता स्वारगेटच्या दिशेने बस रवाना झाली. तत्पुर्वी सकाळी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक किशोर धनकवडे, भोर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत बाठे, पुणे जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिवतरे, भोर तालुका भाजप अध्यक्ष गणेश निगडे, भोर तालुका पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, कापूरहोळचे सरपंच किरण गाडे यांच्या हस्ते पूजन करून स्वारगेटच्या दिशेने बस रवाना करण्यात आली.
पुणे-सातारा महामार्गावरील भोर, वेल्हा, पुरंदर, तसेच कोकणाकडे जाणारा भोरमार्ग कापूरहोळ येथून जातो, तसेच सासवड, जेजुरी, नारायणपूर या भागाला जोडणार रस्ता कापुरहोळ चौकात येतो. या महामार्गावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत अल्प होती. त्यामुळे विद्यार्थी, कामगार, पर्यटक, ज्येष्ठ नागरिक यांना खासगी वडापशिवाय पर्यय नव्हता. नागरिकांना महामार्गावर तासन्‌ तास गाड्यांची वाट पाहावी लागत होती, त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून पीएमपीएलची सेवा कापुरहोळ ते स्वारगेट सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवासी करत होते. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक, कात्रज घाटमाथा पीएमपीएल आणि भोर तालुक्‍यातील सर्व पक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मदतीने ही बससेवा सुरू करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)