महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांची माहिती 

पुणे- स्वारगेट-कात्रज मेट्रो विस्तारीकरण मार्ग आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा मार्ग भुयारीपेक्षा उन्नत (एलिव्हेटेड) करण्यावर महामेट्रोचा भर आहे, अशी माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी शनिवारी पुण्यात दिली.

महामेट्रोकडून पुण्यात सुरू करण्यात आलेल्या पुणे मेट्रोच्या माहिती केंद्रास दीक्षित यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जगभरात मेट्रो प्रकल्पाचा खर्च लक्षात घेऊन उन्नत मेट्रो मार्ग उभारण्यास प्राधान्य दिले जात असल्याचा दावाही दिक्षित यांनी यावेळी केला. ते म्हणाले, जगभरात भुयारी मेट्रो मार्गाला उन्नत मार्गापेक्षा दुप्पट खर्च येतो. आणि एकदा मेट्रो सुरू झाल्यानंतर त्याच्या देखभालीचा खर्चही जास्त करावा लागत असल्याने कात्रज मेट्रोसाठी सगळीकडून भुयारी मार्गाची मागणी असली, तरी उन्नत मार्ग हाच चांगला पर्याय असणार आहे. असे सांगत हा मार्ग उन्नत होणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

या मार्गासह महामेट्रोकडून पिंपरी-चिंचवड ते निगडी आणि नाशिकफाटा-चाकण या मार्गांचा समावेश आहे. या विस्तारामुळे मेट्रोमार्ग 32 किलोमीटरवरून 57 किलोमीटर होणार असून भविष्यात पुणे शहरात सुमारे 200 किलोमीटरचा मेट्रो मार्ग विकसीत होणे शक्‍य असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)