स्वारगेट एसटी स्थानकात ज्येष्ठ महिलेचा ऐवज चोरला

पुणे : एसटी बसने प्रवास करीत असताना एका ज्येष्ठ महिलेच्या प्रवासी बॅगमधील अडीच तोळ्याचे गंठण आणि एक हजाराची रोख असा 56 हजारांचा ऐवज चोरट्याने चोरला आहे. स्वारगेट बसस्थानक ते कात्रज दरम्यान हा प्रकार घडला असून, याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गणेश गायकवाड (रा. सनसिटी रोड) यांचे आई आणि वडिल सांगली येथे मुळगावी जाणार असल्यामुळे ते त्यांना सोडण्यासाठी सोमवार सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानक येथे आले होते. यावेळी त्यांचे आई-वडिल बॅग खुर्चीच्या कडेला ठेवून बसले होते, तर फिर्यादी सांगलीकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत फलाटावर उभे होते. त्यांनी आई-वडिलांना सांगलीकडे जाणाऱ्या एसटीमध्ये 11 वाजण्याच्या सुमारास बसवून दिले. दरम्यान, एसटी बस काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांच्या आईने बॅग तपासून पाहिली असता त्यांचे अडीच तोळ्यांचे गंठण आणि एक हजारांची रोख रक्कम असलेली पर्स चोरट्याने लंपास केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी तपास पोलीस हवालदार एस.ए.शेख करीत आहेत.

स्वारगेट बसस्थानक असुरक्षित
स्वारगेट बसस्थानकात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन चोरट्यांचा येथील वावर वाढला आहे. गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना लूटण्याच्या घटना येथे वारंवार घडतात. मध्यंतरी एका प्रवाशास बिस्कीटातून गुंगीचे औषध देऊन त्याचे दागिने लूटण्यात आले होते. तर प्रवाशांची पाकिटे आणि बॅगांमधील किंमती ऐवजावर चोरांकडून डल्ला मारण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलिसांची गस्त येथे असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्याचा चोरट्यांवर कोणताच परिणाम होत नाही. येथे बस स्थानकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची क्‍लिऍरीटी व्यवस्थित नसल्याने गुन्हा घडल्यावर घटनेचे चित्रीकरणही व्यवस्थित दिसत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)