स्वारगेट उड्डाणपुलाखाली अनधिकृपणे वाहनांची पार्किंग

संग्रहित छायाचित्र

प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दूर्लक्ष, आरटीओसुद्धा जबाबदार

बिबवेवाडी – स्वारगेट येथील उड्डाणपूल खाली अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जातात. या वाहनांमुळे स्वारगेट परिसरात वाहतूक कोंडी होते. स्वारगेट वाहतूक शाखेकडून कधीतरी जॅमर लावून कारवाई केली जाते. वाहतूक शाखेची कारवाई सातत्यने पूर्ण होणे गरजेचे आहे. उड्डाणपुलाखाली वाहने कशी पार्कींग होत आहेत, हे समोर येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साईबाबा मंदिर ते स्वारगेट परिसरात उड्डाण पुलाखाली एसटी डेपो, सहाय्यक पोलीस आयुक्तालय परिसरात खाजगी वाहने अनधिकृतपणे उभी केली जातात. स्वारगेट परिसरतील 4 चौकामधून 16 वाहतूक कर्मचारीसह अधिकारी असतानासुद्धा वाहने उभी केली जात आहेत. उबर, ओला, खाजगी चारचाकी, एसटी महामंडळाच्या शिवशाही बसेस, इतर राज्यातील एसटी बसेस, ट्रॅव्हल एजन्सीच्या बसेस या परिसरात राजरोसपणे पार्कींग केल्या जातात. यापैकी खाजगी ट्रॅव्हल्स काही वाहने प्रवासी भरण्यासाठी पोलिसांसमोर उभी केली जातात.

त्यामुळे वाहतूक कोंडी होते तसेच लहान मोठे अपघात सुद्धा होतात. हलोगा चौक ते मित्रमंडळ रस्त्यावर व नटराज हॉटेल, सहाय्यक पोलीस आयुक्त, पीएमटी डेपो या परिसरात सकाळी 12 वाजेपर्यंत व सायंकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत रस्स्यावर खाजगी ट्रॅव्हल्स बसेस प्रवाशांकरीता उभ्या असतात. एसटीचे प्रवाशी मिळवण्यासाठी स्वारगेट परिसरात खाजगी ट्रॅव्हल्स बसेसला परवानगी नसतानादेखील बसेस कशा येतात, यास एसटी महामंडळ व पोलीस वाहतूक शाखेसह राज्य परिवहन (आरटीओ) जबाबदार असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. उबर व ओला ट्रॅव्हलच्या चारचाकी स्वारगेट परिसरात उड्डाणपूलखाली उभ्या केल्या जातात. बस डेपो समोरील प्रवेशद्वारलगत वाहने उभी केली जातात. उड्डाणपूल खालील उभ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊन सुद्धा प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. स्वारगेट वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी रोज कारवाईसाठी दक्ष असून जामर लावण्यासाठी, उभ्या वाहनवरील कारवाई व स्वारगेट परिसरातील वाहतूक नियंत्रण करणेकामी सतत सकाळी 8 ते रात्री उशिरापर्यंत कारवाई केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)