स्वामी समर्थांच्या भक्‍तीत भाविक रमले

शिवतेज नगर ः प्रकटदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती.
  • प्रकटदिन उत्सव ः शिवतेज नगर येथील मंदिरात कार्यक्रम

पिंपरी, (प्रतिनिधी) – अक्‍कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या प्रकटदिनानिमित्त शिवतेज नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. प्रकटदिनी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. प्रकटदिन उत्सवामुळे परिसरातील वातावरण भक्‍तिमय आणि चैतन्यमय झाले होते.

उत्सवाची सुरुवात सकाळी श्रींच्या अभिषेकाने झाली. त्यानंतर होम-हवन, संपूर्ण दिवस भजन आणि स्वामी गीतांनी वातावरण भारावून गेले होते. सकाळी 10 ते 12 शिवतेज नगर महिला भजनी मंडळ, दुपारी 4 ते 5 श्रद्धा भजनी मंडळ, वल्लभनगर, साई अबोली भजनी मंडळ संभाजी भजनी मंडळांनी सुश्राव्य भजन सादर केले.

सायंकाळी 7 वाजता महाआरती, सायंकाळी 7.30 वाजता ओंकार संगीत संध्या कार्यक्रमात संगीत, भजने, भक्‍तीगीते, भावगीते, स्वामी गीतांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी राजू गुणवंत, हरिनारायण शेळके, दयानंद बिराजदार, चंद्रशेखर आपटे, संतोष शेळके, भीमराव पाटील, प्रदीप नागणे, रमेश जगताप, प्रकाश शिंदे, ज्ञानदेव नारखेडे, दत्तू बहिरवाडे, राजाराम सावंत, श्रद्धा बहिरवाडे, रेखा शेळके, अर्चना तोंडकर, मनिषा देव, कमलिनी जगताप, गीता पाटील, यशवंत भोळे उपस्थित होते.

शिवतेजनगर, शाहूनगर, पूर्णानगर, घरकुल येथील भाविकांनी स्वामी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. राजाराम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष नारायणराव बहिरवाडे यांनी आयोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)