स्वामी विवेकानंदांनी भविष्य व चमत्कार नाकारले

ग्रंथमहोत्सवात आयोजित मुलाखती दरम्यान बोलताना डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर, शेजारी प्रा.यशवंत पाटणे

डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर: देश एकजूटीसाठी असमानता दूर करण्याची गरज

सातारा,दि.6 प्रतिनिधी- स्वामी विवेकानंदांनी भविष्य व चमत्कार नाकारले असून सत्यप्राप्तीमधील ते सर्वात मोठे अडथळे असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ व साहित्यक डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर यांनी व्यक्त केले.
साताऱ्यात आयोजित ग्रंथमहोत्सवातील कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्रा.यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस, सुनिता कदम आदी.उपस्थित होते.
यावेळी स्वामी विवेकानंद यांच्यावर आयोजित मुलाखती दरम्यान बोलताना डॉ.दाभोलकर म्हणाले, जन्मवेळेवरून ज्योतिषांकडून सांगण्यात येणाऱ्या भविष्यावर टीका करताना स्वामी विवेकानंदांनी आकाशात वावरणारे गोळे मनुष्याच्या आयुष्यावर कसे काय परिणाम करू शकतील? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. तर लव्ह जिहादवर विचारलेल्या प्रश्‍नावर मत व्यक्त करताना डॉ.दाभोलकर म्हणाले, मनुष्याला जिवंत राहण्यासाठी अन्न आणि पाण्यासह विचार आणि उच्चार करण्याचे स्वातंत्र्य आवश्‍यक आहे. ज्या स्वातंत्र्यामुळे समाजाला त्रास होणार नाही आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारानुसार देश एक होण्यासाठी सर्व आंतरधर्मीय व जातीय विवाह होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर देश एकजूट होण्यासाठी देशातील स्त्री-पुरूष असमानता दूर व्हावी असे देखील स्वामी विवेकानंदाचे विचार होते. ते शेवटपर्यत जाती अंताचा आणि शिक्षण समृध्द भारत घडविण्याचा विचार करित होते. तसेच धर्मग्रंथांच्या पलिकडील मनुष्य निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व ते करण्यासाठी धर्मग्रंथांचाच आधार घ्यावा लागणार असल्याचे स्वामी विवेकानंदांनी सांगितले असल्याचे डॉ.दाभोलकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, ग्रंथ महोत्सवाला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक बापूजी सांळुंखे यांचे नाव देण्यात आले. शिक्षण संस्थेतून घडलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर बापूजींच्या कार्याची अनुभूती दिसून येते. बापूजी 69 वर्षाच्या कार्यकालात कधी ही स्वस्थपणे झोपले नाहीत. आयुष्यभर चंदनाप्रमाणे झिजले. संघर्षातून त्यांनी ज्ञानाची गंगा ग्रामीण भागात पोहचविली. आज त्यांच्या तत्वज्ञानाचा गजर होत असल्याचा आंनद होत आहे, असे साळुंखे यांनी शेवटी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)