स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या प्रसारासाठी जम्मू ते कन्याकुमारी सायकल यात्रा

गोखळी : जम्मू ते कन्याकुमारी यात्रेसाठी सज्ज असलेले सायकलप्रेमी.

गोखळी, दि. 23 (प्रतिनिधी) – स्वामी विवेकानंदाचे विचार सर्व दूर पोहचावेत आणि सायकल प्रवासाचे फायदे याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे एकमेव उद्देशाने रामकृष्ण मठ आणि निसर्ग सायकल मित्र पुणे यांच्यावतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नऊ सायकलपटू शनिवार, दि. 24 पासून काश्‍मिर ते कन्याकुमारीपर्यंत सुमारे चार हजार कि. मी. अंतराची स्वामी विवेकानंद विचार प्रसारासाठी सायकल यात्रा काढणार आहेत. 28 दिवसांचा प्रवास करून 21 डिसेंबरला कन्याकुमारीला पोहचणार आहे. यात्रेतील मार्गावरील ठिकाणी सायकलिंगचे फायदे, सक्षिप्त चरित्र, विवेकानंद यांचे स्फूर्तीदायक वचने, हिंदी इंग्रजीतील आठ हजार पत्रके वाटण्यात येणार आहेत. 21 डिसेंबर कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकास भेट यात्रा मार्गावरील पंजाबमधील गुरूद्वार धर्मशाळा आणि 18 रामकृष्ण मठात रात्रीचा मुक्काम राहणार आहे. जम्मूहून गुरूदासपूर, अमृतसर, लुधियाना, अंबाला सोनीपन, बहादूरगड, खेत्री, जयपूर, अजमेर, उदयपूर, मोडसा, बडोदा, नवसारी, तलासरी, डोंबिवली, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगावमार्गे शिगाव, चित्रदुर्ग, तुमकूर, बंगळूल, सेलम मार्गे दिंडगड, कोविलपट्टी असा यात्रोचा मार्ग राहणार आहे.
जम्मू-काश्‍मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवासासाठी निघालेल्या सायकलप्रेमी मित्रांना बुधवारी पुणे रेल्वे स्टेशनवरून स्वामी विवेकानंद विचार प्रसारासाठी निघालेल्यांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पृथ्वीराज भोसले, सुरेश माने, सुनील पाटील, सुनील ननवरे, अतुल माने, राहुल नेवाळे, महेंद्र आटोळे, श्रीकांत खटके आणि गुजरातमधून नितीन पाटील सहभागी होणार आहेत. खा.शिवाजीराव आढळराव-पाटील, अमर साबळे, श्रीरंग बारणे, आ. महेश लांडगे, ऍड. गौतम चाबुकस्वार आदींनी सायकल यात्रोनिमित सर्वांना शुभेच्छा दिल्या. विक्रीकर निरीक्षक श्रीकांत खटके आणि मित्रांनी यापूर्वी पुणे कन्याकुमारी पुणे आणि पुणे सातारा सज्जनगड पुणे अशी सायकल यात्रा यशस्वी केली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)