स्वामी विवेकानंदच्या मुलींचे शिष्यवृत्तीत यश

संग्रहित फोटो

लोणी काळभोर- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कन्या प्रशालेतील तीन मुलींनी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले असल्याची माहिती कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सरोज पाटील यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना सरोज पाटील म्हणाल्या की, कन्या प्रशालेतील एकूण 22 विद्यार्थिनी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी 6 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून, त्यापैकी ऋतुजा तात्या भणगे, साक्षी योगेश क्षीरसागर आणि साक्षी बाबुराव कोंडे या तिघींनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या तिघींबरोबरच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मुख्याध्यापिका सरोज पाटील यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)