स्वामी चिंचोलीत पारंपरिक पद्धतीने रामजन्मोत्सव

डिकसळ- रामदास स्वामींचा गावातील मुक्काम आणि गावातील चिंचेची झाडे यामुळे स्वामी चिंचोली असे नाव पडलेल्या गावात पेशवे काळापासून सुरू असलेला राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम आजही मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आली.
दौंड तालुक्‍यातील स्वामी चिंचोली येथे 340 वर्षांपासून राम जन्मोत्सव साजरा केला जातो. बाळाजी पेशवे यांनी बांधलेल्या आणि रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावात मोठ्या भक्‍ती भावाने दरवर्षी रामनवमीचा कार्यक्रम उत्साहात साजरा होतो. ग्रामदैवत राम मंदिराचा परिसर 1 एकराचा आहे. किल्याप्रमाणे तटबंदी असलेले हे मंदिर 340 वर्षांनंतरही भक्कम असून सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराला एकच दरवाजा ठेवण्यात आला आहे, तर समोर श्रीरामाच्या पावलाकडे पाहत असलेली हनुमानाची मूर्ती आहे. तसेच वाळूद्वारे तयार केलेला वैशिष्ट्यपूर्ण गणेशाची मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचा विषय आहे. दरम्याम, आज राजजन्म उत्सव साजरा करण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक एकत्र आले होते. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. तर सकाळपासून भजन किर्तन, काकडा पालखी सोहळा असे धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अदिती इनामदार यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)