स्वाभिमान पक्षाची अस्तित्वासाठी चूळबुळ – विनायक राऊत

रत्नागिरी – स्वाभिमान पक्षाची अवस्था “ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे. त्याची अस्तित्वासाठी सुरु असलेली चूळबुळ आम्हाला गांभीर्याने घ्यायची गरज वाटत नाही. ज्यांच्यावर कोणतेही संस्कार नाहीत, अशा विचाराच्या लोकांनी केलेल्या वक्तव्यांवर आम्हाला उत्तर द्यायची गरज वाटत नाही. त्यांचे मतदारच विसर्जन करतील, असा विश्‍वास शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त करत नारायण राणे यांनाही लक्ष्य केले. ते शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते.

राऊत म्हणाले की, शिवसेनेपुढे स्वाभिमानचे आव्हान असूच शकत नाही. लोकसभा मतदारसंघात ज्यांचा एकच आमदार आहे. त्यांचे आमच्यापुढे काहीच चालणार नाही. शिवसेना जिल्हा परिषद ते ग्रामपंचातीपर्यंत पक्ष पोचला आहे. स्वाभिमान वगळता अन्य पक्षातून आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांना आम्ही लवकरच धक्का देणार आहोत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच युतीबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे योग्यवेळी जाहीर करतील. भाजपनेही जागा वाटपावर जास्त विचार न करता राज्यातील महत्त्वाचा प्रश्‍न बनलेल्या शेतकरी आत्महत्येवर लक्ष केंद्रीत करावे. पंढरपूरच्या महासंमेलनात पक्षप्रमुखांनी महाराष्ट्राला दुष्काळातून मुक्त करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. शेतकरी, फळ उत्पादकांना न्याय देण्यासाठी निर्णय घ्यावेत अशी मागणी शिवसेना करित आहे. भाजप आमचे ऐकेल सध्या आम्हाला शासनाची गरज आहे.

इकोसेन्सिटिव्ह झोनचा निर्णय खासदार नारायण राणे यांच्या मुळेच कोकणावर लादला गेला आहे. मोरोटेरिअममधून रत्नागिरी, सिंधुदुर्गची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यात लवकरच आम्हाला यश येईल, असेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)