स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याचा दिल्लीत मृत्यू  

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याचा दिल्लीत मृत्यू झाला आहे. दिल्लीत आयोजित किसान रॅली साठी गेलेले  किरण गौरवाडे यांचा पहाडगंज येथील आंबेडकरी भवनाच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.

किरण गौरवाडे स्वाभिमानी  शेतकरी संघटनेच्या इतर कार्यकर्त्यांसोबत मिरजमधील ट्रेनने शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीला गेले. त्यांनी आंदोलनात देखील सहभाग दर्शविला होता.  त्यांच्या घरी ४ एक्कर शेती असून आपल्या मुलासोबत ते शेती करत होते. मात्र सततची नापिकीमुळे त्यांच्यावर ५ लाखाचे कर्ज होते. २००८ सालच्या कर्जमाफीतून त्यांचे नाव वगळण्यात आले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.

-Ads-

दरम्यान, दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात पहाडगंज येथील आंबेडकरी भवनाच्या चौथ्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
8 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)