स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्का जाम आंदोलन

वडूज : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात चक्का जाम आंदोलन केले. (छाया:-नितीन राऊत)

वडूजमध्ये स्वाभिमानीने रस्ता रोखला

दर न देता गाळप सुरू करू केल्यास गनिमीकाव्याने आंदोलन

वडूज, दि. 11 (प्रतिनिधी) – ऊस दराची घोषणा न करता खटाव तालुक्‍यातील साखर कारखान्यांनी जर गाळप हंगाम सुरू केले तर गनिमीकाव्याने आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. दरम्यान, वडूजच्या शिवाजी चौकात रास्ता रोको आणि चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांनी संघटनेची पहिली उचल आणि मागील हंगामातील थकबाकीबाबत भूमिका मांडली.
खटाव तालुक्‍यातील साखर कारखान्यांनी 2018- 2019 च्या गळीत हंगामातील उचल जाहीर करून साखर कारखाने सुरू करावेत, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी मागणी केली आहे. त्यासंदर्भात जिल्हधिकारी उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत योग्य निर्णय झाला नाहीतर संध्याकाळपासून गनिमीकाव्याने आंदोलन सुरू होतील असा इशारा दिला होता. 9.5 साखर उतारा बेस धरून एफआरपी या अधिक 200 रुपयांची पहिली उचल जाहीर करावी आणि गेल्या हंगामातील दुसरा हफ्ता तातडीने द्यावे, याबाबत साखर कारखानदारांनी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी साखर कारखानदार यांच्या आडमुठ्या भूमिकेविषयी जोरदार टीका केली. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी सभापती संदीप साळुंखे यांनी उपस्थिती लावली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी एक भूमिपुत्र म्हणुन नेहमीच पाठिंबा देण्यासाठी संघटनेच्या पाठीशी राहणार असे आवाहन दिले. पंचायत समिती सदस्य धनजय चव्हाण, धनाजी गोडसे, शिवसेना तालुका प्रमुख यूवराज पाटील, प्रमोद देवकर, तानाजी देशमुख, राजू फडतरे, दत्तूकाका देशमुख, सविता देवकर, अर्जुन मोरे, उंबर्डेचे धनाजी पवार, सचिन निकम, राजू घनवट उपस्थित होते.
प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता तर तहसीलदार जयश्री आव्हाड, मंडलाधिकारी जगताप, तलाठी आदी आंदोलनस्थळी भेट घेऊन निवेदन स्वीकारले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)