स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे

वेणेगावच्या बंधाऱ्यावर मंगळवारी ठिय्या आंदोलन

नागठाणे – सातारा तालुक्‍यातील वेणेगावसह परिसरातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत व वेणेगाव बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी मंगळवारी 11 रोजी सकाळी दहा वाजता वेणेगावच्या बंधाऱ्यावर ठिय्या आंदोलन होणार आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने आजपर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने जावळवाडी (ता. सातारा) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी पुढाकार घेत संबधित विभागाला निवेदन दिले आहे. याबाबत ठोस निर्णय न झाल्यास बेमुदत वेणेगाव बंधाऱ्यावर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

गेल्या कित्येक वर्षात सातारा तालुक्‍यातील वेणेगावसह परिसरातील रस्त्यांची व वेणेगाव बंधाऱ्याची दुरूस्ती न झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणं धोकादायक झाले आहे. याबाबत वारंवार जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व कण्हेर पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करूनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी पुढाकार घेऊन या अन्यायाचा पाढा संबंधित अधिकाऱ्यांच्यापुढे वाचला.

यावेळी संघटनेचे पदाधिकारी अंगद सावंत, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, मधुकर घाडगे, संजय कांबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजू शेळके म्हणाले की, संबंधित विभागाला वारंवार प्रत्यक्ष भेटून सूचना, निवेदन देऊन विनंती केली. परंतु त्यांच्या कार्यपध्दतीमध्ये कोणताही बदल झाला नाही. अखेर मंगळवारी 11 रोजी सकाळी दहा वाजता पवित्र कृष्णा नदीच्या साक्षीने वेणेगाव बंधाऱ्यावर ठिय्या आंदोलन ग्रामस्थांसह करणार असल्याचे शेळके यांनी आवर्जून सांगितले. सर्व समाजातील शेतकरी नागरिक, विद्यार्थी, पालक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)