स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी नागेश्‍वर विरकर

म्हसवड, दि. 11 (प्रतिनिधी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माण तालुकाध्यक्षपदी नागेश्वर विरकर यांची निवड करण्यात आली आहे. नागेश्वर विरकर हे अनेक वर्षे शेती, मातीशी निगडीत चळवळीत काम करत आहेत. पत्रकार म्हणूनही अनेक वर्षे त्यांनी काम केले आहे. उत्तम संघटन कौशल्य, अभ्यासू, संघर्षशील कार्यकर्ता अशी ओळख. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव,ऊसदर, दुधदराच्या प्रश्नांवर खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालीही त्यांनी काम केले आहे. उरमोडी, जिहे-कठापूरचा पाठपाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी, पाणी चळवळीचा आक्रमक लढा उभा करणार आहे. माण तालुक्‍यात बेसुमार अवैध वाळू उपशाने पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून त्यासाठी पर्यावरण विभाग, पर्यावरण तज्ञांसह वाळू परिषदेचे आयोजन करणार आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणाने स्थानिकांना वाळू चढ्या भावाने घ्यावी लागत आहे. शासनाने स्थानिकांना शासकीय दराने सहज वाळू परवाना द्यावा. यासाठी आगामी काळात खा राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य जनतेच्या प्रश्ननासाठी झटणार असल्याचे विरकर यांनी सांगितले. यावेळी विरकर यांना नियुक्ती पत्र देताना पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष, प्रकाश बालवाडकर, अमरसिंह कदम, जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, सुर्यकांत भुजबल वरील मान्यवरांसह खा.राजू शेट्टी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)