स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन

नेवासा फाटा – येथील राजमुद्रा चौकामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत म्हणाले, आजवर सत्ता भोगलेल्या पक्षांनी गेल्या 60 ते 70 वर्षात शेतकऱ्यांची पिळवणूक केलेली आहे. विद्यमान सरकारने देखील तेच चालविले आहे. शेतकऱ्यांची दुरवस्था करणारे भाजप सरकार खाली खेचणार आहोत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ. अशोकराव ढगे यांनी आलेल्या शेतकऱ्यांचे स्वागत केले. राज्याचे उपाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी प्रास्ताविक करतांना शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येऊन 7/12 कोरा करण्यात यावा, कृषिपंपाचे वीज बिल पुर्णपणे माफ करण्यात यावे, एफ.आर. पी. प्रमाणे एक रकमी व सरकारी अनुदान मिळावे, दुष्काळ निधी किमान पाच हजार एकराप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, कांदा आणि दुधास शासकीय अनुदान मिळावे, शेतकऱ्यांना पेन्शन अनुदान योजना लागू करावी अशा मागण्या त्यांनी यावेळी बोलताना मांडल्या.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनाध्यक्ष प्रकाश पोकळे, गुलाबराव डेरे, प्रताप पटारे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांची यावेळी भाषणे झाली. सुमारे अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी झालेल्या चक्काजाम आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गर्धे,शेतकरी नेते पी.आर.जाधव, गणेश चौघुले, गणेश झगरे, ज्ञानेश्वर सोडनार, शेतकरी गोसावी बाबा,सोपान कोरडे, पोपटराव सोडणार यांच्यासह जिल्ह्यातून शेतकरी उपस्थित होते. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश थोरात, शेतकरी नेते पी.आर. जाधव यांनी आभार मानले. यावेळी निवासी नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर व पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)