स्वाभिमानीच्या पाठपुराव्याला यश

पुणे : साखर आयुक्त यांच्याशी चर्चा करताना सचिन नलवडे व पदाधिकारी.

आयुक्तांचे साखर कारखान्यांना पत्र

कराड, दि. 11 (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु होऊन दोन महीने झाले तरी शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे ऊसाची बिले अदा केली नाहीत. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना सदर साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी पत्रकाद्वारे केली होती. तरीही साखर आयुक्त कार्यालयाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने जिल्ह्यातील स्वाभिमानी च्या पदधिकाऱ्यांनी पुणे येथे साखर आयुक्तांची भेट घेवून बिले न देणाऱ्या साखर सम्राटावर त्वरित कारवाई करण्यासंदर्भात निवेदन दिले आणि त्वरित कारवाई झाली. नाही तर स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या स्वाभिमानी च्या पदाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेत शेखर गायकवाड यांनी सर्व सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना परिपत्रक काढून ऊस नियत्रंण आदेश 1966 चे कलम 3 (3) मधील तरतूदी नुसार चालू हंगामामध्ये गाळप केलेल्या ऊसापोटी चौदा दिवसात एफआरपी प्रमाणे होणारी किंमत अदा करावी तसेच विहित मुदतीत एफआरपी प्रमाणे ऊस देयक न दिल्यास कलम 3 (3अ) अनुसार विलंब कालावधी करता पंधरा टक्के व्याज आकारण्याची तरतुद असून त्याप्रमाणे सर्व साखर कारखण्यांना आदेश दिल्याचे सांगितले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सहकारी व खाजगी मिळून चौदा साखर कारखाने असल्याचे सांगितले.
सदर कारखाने अजिंक्‍यतारा सातारा, बाळसाहेब देसाई पाटण, कराड तालुक्‍यातील सह्याद्रि, कृष्णा, जयवंत शुगर, रयत अथनी, वाई तालुक्‍यातील किसनवीर भुईज, प्रतापगड किसनवीर, फलटण तालुक्‍यातील श्रीराम जवाहर, स्वराज इंडिया, शरयु शुगर्स, जरंडेश्वर कोरेगांव व ग्रीन पॉवर गोपूज खटाव इत्यादि कारखान्यांचा समावेश आहे.
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, शंकर शिंदे, अलीभाई इनामदार, धनंजय माहमूलकर, सातारा तालुकाध्यक्ष संजय साबळे, कराड उत्तर अध्यक्ष शिवाजी पाटील, बी. जी. साबळे, रहिमतपूर अध्यक्ष विक्रम निकम, विनायक पाटील, राहुल शिंदे, सौरभ वळवाडे, शुभम सोनमल उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)